शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करा - पालकमंत्र्यांचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 13:26 IST

अकोला : बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे सांगत, विशेष तपासणी पथके तयार करून बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.

अकोला : बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे सांगत, विशेष तपासणी पथके तयार करून बियाणे-खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर येणारे काही महिने शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, पीक कर्ज, बियाणे, खते व कीटकनाशके आणि इतर प्रकारच्या कामात शेतकºयांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कामे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. खरीप पेरणीसाठी शेतकºयांना आवश्यक असलेले बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे सांगत, बोगस बियाणे व खतांसंदर्भात तक्रारींवर तातडीने कारवाई करावी, त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात विशेष तपासणी पथके गठित करून बियाणे व खतांचा काळाबाजार करणाºयांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाºया उपाययोजना, बियाणे-खतांची उपलब्धता, कृषी पंप जोडण्या, पीक कर्जाचे वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, रस्त्यांची कामे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.शेतकºयांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करा!पीक कर्जासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना बँकांनी तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकºयांच्या अडचणी सोडवून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना देत, जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यांतील शेतकºयांसाठी प्राप्त झालेली १३७ कोटी रुपयांची दुष्काळी मदत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.अकोला शहराला ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध!जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार अकोला शहराला ४० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४०० दिवस पुरेल एवढा चारासाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.२५०० घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करा!प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात नवीन तयार झालेल्या २५०० घरकुलांना दीनदयाल उपाध्याय उजाला योजनेंतर्गत वीज जोडणी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महावितरण कंपनीला दिले, तसेच उज्ज्वला योजनेंर्गत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.नेकलेस रोडवरील विद्युत खांब हटवा!अकोला शहरातील नेकलेस रोडवरील विद्युत खांब हटविण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण करून, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाहन पार्किंग व्यवस्था सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या. सांस्कृतिक भवनासाठी फर्निचर, विद्युतीकरण, आवारभिंत, स्वीमिंग पूल व इतर कामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.गौण खनिज अवैध वाहतुकीवर कारवाई करा!गौण खनिज अवैध वाहतूक संदर्भात पोलीस विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पोलीस विभागाला दिले. वाळूचे अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र पथक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

 

टॅग्स :Dr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAkolaअकोला