शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

१२८ ग्रा.पं. सदस्य, १३ सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:22 IST

अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे

अकोला: ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी प्रक्रिया शुक्रवार, १६ आॅगस्टपासून अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहेग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येते. सन २०१५-१६ आणि २०१७-१८ या दोन वर्षात अकोला तालुक्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडून आलेल्या १३ सरपंच व १२८ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यानुषंगाने विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला उपविभागीय अधिकाºयांना दिले. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्टपासून अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली. या सुनावणीमध्ये संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे जबाब नोंदविल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.९४ सदस्यांची घेतली सुनावणी; जबाब नोंदविले!विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीचर नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या ९४ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. संबंधित सदस्यांचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या समक्ष जबाब नोंदविण्यात आले.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAkolaअकोला