सचिन राऊत / अकोला:ह्यस्वाइन फ्लूह्ण आजारावर प्रतिबंधासाठी आवश्यक असलेला ह्यआयसोलेशन वॉर्डह्णच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यान्वित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. १९ क्रमांकाच्या वॉर्डातील एका खोलीत हा वॉर्ड ९ फेब्रुवारी रोजी कार्यान्वित केला, मात्र आवश्यक त्या सुविधा या वॉर्डात नसून, कुणाचाही सहज वावर असल्याने अनेकांना स्वाइन फ्लूचा धोका आहे. स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळलेला वैद्यकीय महाविद्यालयातील सुरेश सिंह आणि वाशिम जिल्हय़ातील गरोदर महिला अरुणा रामप्रकाश अवचार यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांसोबतच वाशिम जिल्हय़ातील आणखी एका महिलेला स्वाइन फ्लू संशयित म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. वॉर्ड कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून आलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नसून, थातूरमातूर वॉर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांना स्वाइन फ्लूचा धोका असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. गर्भवती असलेल्या महिलेलाही स्वतंत्र कक्षात न ठेवल्याने इतर महिलांना स्वाइन फ्लूची बाधा होण्याची शक्यता आहे. *एकापासून पाच विद्यार्थ्यांंना बाधाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षाला असलेल्या सिंह ला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र त्यानंतरही त्याला रुग्णालयात दाखल न करता वसतिगृहातच ठेवल्याने आणखी पाच विद्यार्थ्यांंना बाधा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सिंहला स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळला असतानाही त्याला रुग्णालयात दाखल केले नसल्याने या आजाराचा सामना आणखी ५ विद्यार्थ्यांंना करावा लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे विद्यार्थ्यांसह आणखी काही रुग्णांना स्वाइन फ्लूचा धोका निर्माण झाला आहे.
‘स्वाइन फ्लू’ रुग्णांसाठी नाही ‘आयसोलेशन वॉर्ड’
By admin | Updated: February 14, 2015 01:29 IST