शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूने बाधित रुग्ण शासकीय मदतीपासून वंचित!

By admin | Updated: April 24, 2015 02:11 IST

अकोला जिल्ह्यात समितीची एकही बैठक नाही.

अकोला : स्वाइन फ्लूच्या रूग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण आणि उपचारावर होणार्‍या अत्याधिक खर्चामुळे राज्य शासनाने रुग्णांच्या उपचाराचा खर्च देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीचे गठण करण्यात आले; परंतु समितीची अद्याप एकही बैठक न झाल्याने उपचार घेणार्‍या रुग्णांची माहितीच तयार होऊ शकली नाही. त्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आर्थिक मदतीपासून वंचित असून, याबाबत आरोग्य विभागही चुप्पी साधून आहे. राज्यात दोन महिन्यांपूर्वी स्वाइन फ्लूने हैदोस घातला. हजारो रुग्णांना स्वाइन फ्लूची बाधा झाली. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा प्रकोप वाढल्याने राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमध्ये २ मार्चनंतर व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. रुग्णांच्या उपचाराचा खर्च देण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून तीन कोटी रुपये आरोग्य सेवा संचालक (मुंबई) यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात पात्र रुग्णांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली; परंतु अकोल्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीची एकही बैठक अद्याप झाली नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले स्वाइन फ्लूचे रुग्ण आर्थिक मदतीपासून वंचित आहे.                                                                                                                                                        दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या स्वाइन फ्लू रुग्णांची माहिती मागविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगीतले. संपूर्ण माहिती गोळा झाल्यावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पात्र रुग्णांची आर्थिक मदतीसाठी निवड होणार असल्याची माहिती दिली.

*सीजीएचएसच्या नियमानुसार मिळणार मदत

          २0 मार्च रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार करणार्‍या गरीब रुग्णांना सीजीएचएस (केंद्र सरकार आरोग्य योजना) अंतर्गत आर्थिक मदत करण्यात येणार होती; परंतु स्थानिक स्तरावर याबाबत उदासीनता दिसून येत आहे.