शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

शहरावर स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:23 IST

अकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्‍या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देमहापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग, मलेरिया विभाग झोपेतस्लम एरियात सर्वाधिक रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस, तापमानात होणारा बदल आणि त्यात भरीस भर शहराच्या कानाकोपर्‍यात साचलेली घाण यामुळे शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. खासगी रुग्णालयात दाखल झालेले स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण पाहता अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असणार्‍या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य विभाग व मलेरिया विभागाकडून नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, यावर प्रशासनानेच अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. दिवसभर कडाक्याचे तापणारे ऊन, त्यामुळे निर्माण होणारा उकाडा आणि सायंकाळ होताच थंडी अशा बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिवर’ची साथ पसरली आहे. शहरात राबवल्या जाणार्‍या ‘स्वच्छता मोहिमे’चा आधार घेत सर्वत्र साफसफाईची कामे चोखपणे होत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. परिस्थिती नेमकी उलटी आहे. मागील २0 दिवसांपासून शहरात नित्यनेमाने साफसफाई होत आहे. तरीसुद्धा साचलेली घाण व केरकचरा पाहता हा कचरा नेमका येतो कुठून, असा सवाल उपस्थित होतो. या सर्वांचा परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर झाला असून, साथ रोगांमुळे शहरातील खासगी रुग्णालये रुग्णांमुळे ‘हाऊसफुल’ असल्याचे दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे तसेच विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही लहान मुले,वयोवृद्ध नागरिकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. काही खासगी रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत. यातील डेंग्यूच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने ‘पॉझिटिव्ह’आढळले आहेत. वातावरणातील बदल अशा जीवघेण्या आजारांसाठी पोषक ठरतात. 

स्लम एरियात सर्वाधिक रुग्णशहरातील स्लम आणि झोपडपट्टी भागात साफसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला असून, आरोग्य निरीक्षकांसह सफाई कर्मचार्‍यांना काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येते. परिणामी या भागात संसर्गजन्य आजारांचा उद्रेक झाला असून, प्रत्येक घरातील एक रुग्ण तापाने फणफणत असल्याचे चित्र आहे. अशा भागात मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने व मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणांचा कारभार कागदोपत्री सुरू असल्याची विदारक परिस्थिती आहे.

आयुक्त साहेब, याकडे लक्ष द्याल का?अकोलेकरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांच्या वेतनावर वार्षिक कोट्यवधींचा खर्च होत असला तरी या विभागाचा कारभार कागदोपत्री सुरू आहे. किसनबाई भरतीया व कस्तुरबा गांधी रुग्णालयात कार्यरत संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कामकाजाचे कोणतेही मूल्यमापन किंवा आकस्मिक तपासणी होत नसल्यामुळे या विभागातील निर्ढावलेले बहुतांश अधिकारी-कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याची माहिती आहे. या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आपसांत कमालीचे ‘ट्युनिंग’ आहे. लेखी स्वरूपात रजेचा अर्ज सादर न करता काही कर्मचारी कामावरून पळ काढत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारांकडे मनपा आयुक्त अजय लहाने लक्ष देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.