शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानक, बसस्थानकावर स्वाइन फ्लूची नागरिकांत धास्ती

By admin | Updated: April 17, 2017 02:03 IST

अकोला: स्वाइन फ्लूची लागण झाल्याने अकोल्यातील दोघांचा बळी गेल्याने आणि काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

अकोला: स्वाइन फ्लूची लागण झाल्याने अकोल्यातील दोघांचा बळी गेल्याने आणि काही रुग्ण संशयित आढळल्याने जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अकोला रेल्वेस्थानक आणि बसस्थानकावरील गर्दीत प्रवासी नाकाला रूमाल बांधलेल्या स्थितीत फिरताना आढळतात. विचारणा केली असता, याबाबत काहींनी स्वाइन फ्लूची धास्ती बोलून दाखविली. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा समावेश जास्त दिसून आला. एकीकडे प्रवाशांमध्ये स्वाइन फ्लूच्या लागणची भीती आणि नागरिकांत दहशत जाणवत असली तरी आरोग्य विभाग, महापालिका प्रशासन, रेल्वेस्थानक, बसस्थानक प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली गेलेली नाही. अमरावती आणि इतर ठिकाणाहून अकोल्यात स्वाइन फ्लूचा प्रसार होऊन दोघे दगावले. काही संशयित रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूचा अधिकृत आरोग्य अहवाल आलेला नसल्याने त्यांना स्वाइन फ्लूचे रुग्ण म्हणता येणार नाही. महापालिकेने स्वच्छतेबाबत नीगा राखण्याचे निर्देश दिले; मात्र त्या पलीकडे काहीही केलेले नाही. सर्वोपचार रुग्णालयाने दखल घेणे गरजेचेजिल्हा सर्वोपचार विभागानेदेखील अजूनही पाहिजे तशी दखल घेतलेली नाही. सामाजिक संस्थादेखील अजून पुढे आलेल्या नाहीत. योग्यवेळी आळा घातला गेला तर ही समस्या लवकरच आटोक्यात येऊ शकते. अन्यथा हाताबाहेर गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणाहून स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाबरू नका...काळजी घ्या - जिल्हाधिकारीजिल्ह्यात स्वाइन फ्लूने शिरकाव केला असून, आतापर्यंत या आजाराने तिघांचे बळी घेतले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शनिवारी स्वाइन फ्लू व उष्माघाताबद्दल आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सज्जतेचा आढावा घेतला. जनतेने घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.जिल्ह्यात सध्या स्वाइन फ्लूचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोेरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाइन फ्लू व उष्माघाताबाबत आढावा घेतला व सर्व आरोग्य संस्था स्वाइन फ्लू व उष्माघात या आजारांशी लढण्यास सज्ज असल्याची खात्री केली.जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे स्वाइन फ्लू व उष्माघाताच्या उपचाराकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. रुग्ण आढळून आल्यास त्वरित आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल व्हावे. नागरिकांनी स्वाइन फ्लू व उष्माघाताची धास्ती न घेता खबरदारी बाळगण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.