शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत ‘स्वाइन फ्लू’चे २0 बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:36 IST

अकोला : स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य  आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू  त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने  खासगी  इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा  शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत जिल्हय़ात स्वाइन फ्लूच्या  बळींची संख्या २0 वर पोहोचली आहे. या  कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून आले  असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे.  

ठळक मुद्देअकोला जिल्हय़ात ‘स्वाइन’ची धास्ती कायम ८२ रुग्ण पॉझिटिव्ह,  १४८ संशयित

अतुल जयस्वाल। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य  आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू  त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने  खासगी  इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा  शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत जिल्हय़ात स्वाइन फ्लूच्या  बळींची संख्या २0 वर पोहोचली आहे. या  कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून आले  असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे  निष्पन्न झाले आहे.  राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घालणार्‍या स्वाइन  फ्लूने अनेकांचे बळी घेतले असून, या आजाराची  धास्ती सर्वत्र कायम आहे. श्‍वसन यंत्रणेशी संबंधित  असलेला हा आजार एच १ एन १ या अत्यंत घातक  विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून हा विषाणूचा  प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसर्‍याला  या आजाराची लागण होते. या विषाणूंचा प्रसार  रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम,  त्याची थुंकीमधून होतो. अकोल्यात यावर्षी मार्च  महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला. तेव्हापासून या आजाराने डोके वर  काढले असून, आतापर्यंत २0 जणांचा या संसर्गजन्य  आजाराने बळी घेतला आहे. मार्च ते ६ सप्टेंबर  २0१७ या कालावधीत १४८ संशयित रुग्ण आढळून  आले असून, त्यापैकी ८२ जणांना स्वाइन फ्लू  झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी ६२ रुग्ण एक  तर बरे झाले आहेत किंवा त्यांच्यावर शहरातील  खासगी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात उपचार सुरू असल्याची नोंद आरोग्य  विभागाकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाइन  फ्लूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने नागरिकांमध्ये  दहशतीचे वातावरण आहे.

आणखी दोन दगावले; नऊ रुग्णांवर उपचार सुरूस्वाइन फ्लू या आजारामुळे शनिवार, २ सप्टेंबर रोजी  एक महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती  समोर आली आहे. सद्यस्थितीत शहरातील खासगी  इस्पितळं आणि सवरेपचार रुग्णालयात स्वाइन  फ्लूसदृश लक्षणे आढळून आलेल्या ९ रुग्णांवर उ पचार सुरू आहेत. यापैकी ६ रुग्णांना स्वाइन फ्लू  झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित तीन रुग्ण संशयित  असून, त्यांचे स्वॉब तपासणीसाठी नागपूर येथील  प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले  आहेत. या सर्व रुग्णांवर टॅमी फ्लू उपचार सुरू  करण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.-