यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. स्थानिक शिवाजी चौकात १२ जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अकोला येथील डॉक्टरांची टीम उपस्थित होती. त्यामध्ये डॉ.विक्रांत इंगळे, डॉ.महेश जयस्वाल, डॉ.अविनाश सातारकर, डॉ.नीलेश गायकवाड, डॉ.रोशन बालबंसी, डॉ.आकाश मलातपुरे व वैभव काळे यांनी सेवा दिली. या शिबिराचा २३० गरजूंनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. दीपक जोशी, निनाद पाठक, मनीष फाटे, ऋत्विज वारे, रुपेश तलवारे, प्रणव फुलझेले, प्रसाद धारपवार, ऋषभ नागवान, ऋषिकेश गडेकर, महेश वाघमारे, प्रथमेश मांजरे, शुभम अवताळे, अनुज कावरे, हिमांशू जाधव, गौरव दज्जूका, रोहित गुंजाळ, प्रथमेश सवाई, सौरभ मुळे, वैभव नीलेश मुळे, श्रेयस लोणकर, प्रतीक मालठाणे यांनी परिश्रम घेतले. (फोटो)
मूर्तिजापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:16 IST