शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’;‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:31 IST

शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

अकोला: राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ आणि आता ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामांचे मूल्यमापन केले जात आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. याकरिता केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत शहरांची तपासणी केल्याचे दावे केले जात असतानाच प्रत्यक्षात शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी तुंबलेला कचरा तसेच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरांमधील किळसवाणे चित्र पाहता ‘क्युसीआय’ची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ तसेच स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत महापालिका, नगर परिषद, नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामांच्या मूल्यमापनाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. सदर मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटीच्या आधारावर अपेक्षित आहे. संबंधित स्वायत्त संस्थांचे ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ अंतर्गत मूल्यापन करण्यात आले होते. राज्यातील सर्व शहरांची कामगिरी उच्चतम होण्यासाठी शहरांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाने बक्षीस योजना जाहीर केली होती. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत स्वच्छ सर्वेक्षण -२०१८ मध्ये राज्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली होती. अभियानच्या पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना मनाई करून त्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आले होते. त्यानंतर वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांची तपासणी करणे, मोकळ््या मैदानांची पाहणी करण्यासह शहरातील सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया) मार्फत तपासणी करण्यात आली. क्यूसीआयच्या अहवालानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्था केंद्र व राज्य शासनाच्या प्रोत्साहनपर बक्षिसाकरिता पात्र ठरल्या होत्या.पुन्हा एकदा घाणीचे साम्राज्य‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ नुसार राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार स्वायत्त संस्थांनी काम सुरू केले असले तरी प्रत्यक्षात शहरांमध्ये साचलेला कचरा, उघड्यावर शौच करणाºयांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे ‘क्यूसीआय’च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका