शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूचा पाठलाग करताना ‘सुमेध’ला वीरमरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:57 IST

अकोला : हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कुख्यात दहशतवादी शोपिया जिल्हय़ातील फुलवाणी व अवनिरा या गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान लष्कराद्वारे राबविण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा पाठलाग करताना सुमेध गवई यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या आणि मानेत, मांडीवर व छातीत गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आले. सुमेधसोबत चकमकीत सहभागी असलेल्या नायब सुभेदार बाळासाहेब खराटे यांनी हा थरार सोमवारी कथन केला.

ठळक मुद्देनायब सुभेदारांनी कथन केला चकमकीचा थरारदोन्ही गावे अतिसंवेदनशील; बुलेटप्रूफ वाहनातून गस्त

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कुख्यात दहशतवादी शोपिया जिल्हय़ातील फुलवाणी व अवनिरा या गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान लष्कराद्वारे राबविण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा पाठलाग करताना सुमेध गवई यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या आणि मानेत, मांडीवर व छातीत गोळी लागल्याने त्यांना वीरमरण आले. सुमेधसोबत चकमकीत सहभागी असलेल्या नायब सुभेदार बाळासाहेब खराटे यांनी हा थरार सोमवारी कथन केला.हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कुख्यात दहशतवादी यासीन इटू फुलवाणी व अवनिरा गावात असल्याची माहिती लष्कराच्या छावणीला मिळाली. या माहितीच्या आधारे लष्कराच्या अधिकार्‍यांनी या गावात तपासणी करून ऑपरेशन राबविले. मात्र, यावेळी यासीन इटू हा चकमा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला. लष्कराच्या अधिकार्‍यांसह सुमेध गवई यांनी यासीन इटूचा पाठलाग केला. पाठलाग करीत असतानाच याच परिसरातील एका गावातील ग्रामस्थांनी सैन्यातील जवानांवर प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीनंतर लष्कर व दहशवाद्यांमध्ये गोळीबार झाला. जवानांवर एकीकडून ग्रामस्थांची दगडफेक सुरू होती, तर दुसरीकडून दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता. मध्येच अडकलेल्या जवानांपैकी वीरपुत्र सुमेध गवई यांच्यावर चकमकीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने सुमेधच्या मानेत पहिली गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला, अशा अवस्थेत तो खाली कोसळताच दहशतवाद्यांनी वीरपुत्र सुमेधच्या छातीवर आणि पायावर गोळय़ा झाडल्याने त्यांना जागेवरच वीरमरण आले. सुमेध गवई यांच्यासोबत चकमकीत सहभागी असलेल्या नायब सुभेदार बाळासाहेब खराटे यांनी ही आपबिती कथन केली असून, सिनेमातील प्रसंगालाही लाजवेल, असा थरार त्यांनी अनुभवल्याचे सोमवारी अंतिम संस्काराच्या वेळी सांगितले.

दोन्ही गावे अतिसंवेदनशीलकाश्मीरमध्ये असलेले फुलवाणी आणि अवनिरा ही दोन्ही गावे प्रचंड अतिसंवेदनशील असल्याची माहिती सैन्यातील अधिकार्‍यांनी दिली. या दोन्ही गावात जवानांवर दगडफेक होत असल्याचेही त्यांनी सांगितले. चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांच्या विघातक कारवायांसाठी ही दोन्ही गावे सुलभ असल्याने या दोन गावांतून नेहमीच अशाप्रकारच्या कारवाया करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

बुलेटप्रूफ वाहनातून गस्तअवनिरा व फुलवाणी या दोन गावांमध्ये बुलेटप्रूफ वाहनांमधूनच लष्कराचे जवान गस्त घालतात, अशी माहिती नायब सुभेदार बाळासाहेब यांनी दिली. या दोन गावांत दहशतवादी घुसत असल्याने लष्करांच्या जवानांना मोठा धोका आहे. त्यामुळेच बुलेटप्रूफ वाहनातून गस्त घालण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.