शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खांबोरा पाणीपुरवठा योजनेला सुकळी नंदापूरचा आधार

By admin | Updated: March 18, 2015 01:34 IST

पाणीटंचाई निवाणार्थ ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करण्यास शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला सुकळी नंदापूर तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी सोमवारी शासनाने ९४ लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील ६४ गावांना पाणी पुरविले जाते. खारपाणपट्टय़ातील बहुतांश गावे या योजनेत येतात. या गावांमधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, या योजनेसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यासाठी ४ नोव्हेंबर २0१४ रोजी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांची खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात काटेपूर्णातून पाणीपुरवठय़ासाठी लागणारा कालावधी अधिक असल्याने या प्रस्तावाचा उन्हाळ्य़ातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कोणताही फायदा होणार नव्हता, याची जाणीव आ. सावरकर यांनी प्रशासनाला करून दिली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या योजनेला सुकळी नंदापूर साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. २0 फेब्रुवारी २0१५ रोजी झालेल्या सचिवस्तरीय बैठकीत या योजनेला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून मंगळवार, १0 मार्च रोजी ९४.६६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.