शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:49 IST

शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगनमताने संगणकात ऑनलाइन नोंद करून गजराज मारवाडी यांच्या नावे केला. यामध्ये सहभागी असणार्‍या तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी अकोला उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला दिला आहे. त्यामुळे आता या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

ठळक मुद्देभूमी अभिलेखच्या उपसंचालकांनी दिला निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश२0१५ मध्ये फौजदारी का नाही?संगणकीय डाटा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रात

सचिन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगनमताने संगणकात ऑनलाइन नोंद करून गजराज मारवाडी यांच्या नावे केला. यामध्ये सहभागी असणार्‍या तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी अकोला उप-अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला दिला आहे. त्यामुळे आता या अधिकारी व कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस व भूमी अभिलेख कार्यालयात झाल्यानंतर ‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर अकोला येथील भूमी अभिलेख विभागाच्या उप-अधीक्षकांनी या प्रकरणात एका कर्मचार्‍यावर जबाबदारी निश्‍चित करून कारवाईचा थातूर-मातूर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविला. मात्र, सदर प्रकरण भूमी अभिलेख विभागाचे नागपूर येथील उपसंचालक यांनी गांभीर्याने घेतले असून, एवढय़ा गंभीर प्रकरणात केवळ एका कर्मचार्‍यावर कारवाईचा प्रस्ताव पाठविणार्‍या अधिकार्‍यांची कान उपटणी करीत त्रुटींचा असलेला प्रस्ताव परत पाठवून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.  या नवीन प्रस्तावामध्ये हा भूखंड हडप करण्यासाठी ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा सहभाग होता, त्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करून निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी या गंभीरप्रकरणी सर्व दोषींवर फौजदारी तसेच विभागीय कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

२0१५ मध्ये फौजदारी का नाही?भूखंड हडप प्रकरणात २0१५ मध्ये पहिली तक्रार झाली होती. त्यावेळीच अकोला येथील भूमी अभिलेख विभागाच्या उप अधीक्षकांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई का केली नाही, असा सवाल भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात थातूर-मातूर कारवाईचा प्रस्ताव सादर करणार्‍या अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर निलंबणाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

संगणकीय डाटा राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातभूखंड हडप प्रकरणाचा संगणकीय डाटा पुणे येथील जमाबंदी आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जमाबंदी आयुक्त हा डाटा पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्रात पाठविणार असून, त्याचा अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. या अहवालात सर्व तांत्रिक मुद्दे स्पष्ट होणार असून, या भूखंडाचे दस्तावेज केव्हा तयार झाले, अधिकार कुणाला होते, हे सर्व स्पष्ट होणार आहे.

अकोला येथील भूखंड हडप प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणात अकोला कार्यालयाने त्रुटी असलेला कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता, त्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवून मुद्देसुद आणि त्रुटी पूर्ण करून हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचा आदेश दिला आहे. हा भूखंड हडप करण्यासाठी सहभागी असलेल्या अकोला येथील भूमी अभिलेख विभागाच्या तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. २0१५ मध्ये तक्रारी झालेली असताना त्याचवेळी फौजदारी कारवाई का करण्यात आली नाही, यासह सर्व बाबींचे स्पष्टीकरण प्रस्तावात मागण्यात आले आहे.- बी. डी. काळेउपसंचालक, भूमी अभिलेख विभाग, नागपूर