शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित चार कर्मचाऱ्यांची होणार विभागीय चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:13 IST

अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे.

अकोला : कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीसाठी पैसे उकळणाºया अकोला पंचायत समितीमधील ‘त्या’ चार कर्मचाºयांच्या निलंबनानंतर विभागीय चौकशीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर केला जाणार आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार देण्याची तयारी प्रशासनाने चालवल्याची माहिती आहे.सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी निश्चिती करण्याची प्रक्रिया संबंधित विभागांना पूर्ण करावी लागते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विभाग वगळता पंचायत समित्यांमध्ये वेतन निश्चितीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील सातही पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील मिळून ४,५२६ प्रकरणे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित ३,६७८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये कर्मचारी वेतन निश्चितीसाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारीही मध्यंतरी झाल्या. त्यानंतर अकोल्यासह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समित्यांमध्ये विशेषत: शिक्षकांना रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी झाल्या. त्याबाबतच्या पडताळणीत अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे ८४२ प्रकरणे प्रलंबित असल्याने कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये पंचायत समितीमध्ये कार्यरत संबंधित कर्मचारी पैसे उकळत असल्याचे पुढे आले. त्यामुळे अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कार्यरत चौघांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये पी. के. चंदेल, सय्यद रियाजोद्दीन, पी. एम. मोहोड व डी. ए. महल्ले यांचा समावेश आहे. या चौघांची विभागीय चौकशी करण्यासाठीचा प्रस्तावही तयार केला जात आहे. सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद