शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित कर्मचा-यांना पदे!

By admin | Updated: October 10, 2016 03:18 IST

अमरावती विभागातील सर्वच जिल्हय़ांमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू; भ्रष्टाचारासाठी पुन्हा कुरण मोकळे!

सदानंद सिरसाट अकोला, दि. 0९- फौजदारी कारवाईनंतर निलंबित झालेल्या शासकीय कर्मचार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत कार्यकारी पदावर देऊ नये, हा शासनाचा नियम नियुक्ती प्राधिकार्‍यांनी धाब्यावर बसवला आहे. तलाठय़ांसोबतच इतरही विभागाच्या कर्मचार्‍यांना पुन्हा त्याच पदावर दिले जात असल्याने भ्रष्टाचारासाठी संधीच मिळत आहे. अमरावती विभागातील सर्वच जिल्हय़ांमध्ये हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यासारख्या गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर निलंबित केले जाते. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे लाचलुचपतीची असतात. त्या कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेण्याचे शासनाचे धोरण आहे; मात्र त्याचवेळी संबंधित कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेताना कोणत्याही परिस्थितीत त्याचे मूळ पद किंवा कार्यकारी पद, जनसंपर्क येणारे पद देऊ नये, असा नियमही आहे. निलंबित ह्यकह्ण आणि ह्यडह्ण वर्ग कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत घेणारी विभागीय आयुक्तांची समिती तसा उल्लेख करून आदेश देते; मात्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २0११ रोजीच्या आदेशातील परिच्छेद पाचमधील मुद्याला बगल देत कर्मचार्‍यांना कार्यकारी पद दिले जात आहे. त्यामध्ये संबंधित अधिकारीही तेवढेच गुंतलेले असल्याने हा प्रकार सुरू आहे. निलंबित तलाठी सर्वाधिक लाभार्थीलाचलुचपतीच्या प्रकरणात निलंबित झालेल्या तलाठय़ांना तर काहीच फरक पडत नाही. पुनस्र्थापनेच्या आदेशानंतर संबंधित उपविभागीय अधिकारी त्या तलाठय़ांचा केवळ तालुका बदलतात. तलाठी पदावरच पुन्हा नियुक्ती देतात. अमरावती विभागात वर्षभरात म्हणजे ऑगस्ट २0१५ पासून २८ तलाठी, सात अव्वल कारकून, तर १७ इतर विभागाच्या २0 कर्मचार्‍यांना पुनस्र्थापना देण्यात आली आहे, हे विशेष.वर्षभरात पुनस्र्थापना झालेले तलाठीअकोला जिल्हय़ात निलंबनानंतर पुनस्र्थापित झालेल्या तलाठय़ांमध्ये डी.पी. मनवर, व्ही.जे. देशमुख, एम.के. वाळके, एस.एम. उखळकर, अमित सबनीस, धम्मपाल नकाशे, बाबाराव नक्षणे, दर्शन चव्हाण, ऊर्मिला गव्हाळे, शारदा तायडे, संतोष कर्णावार मंडळ अधिकारी, अव्वल कारकून आर.एफ. राठोड, लिपिक व्ही.आर. जाधव यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेसह इतर विभागही आघाडीवरशासनाच्या सर्वच विभागातील निलंबित कर्मचार्‍यांना पुनस्र्थापित करण्याचा विभागीय समितीच्या बैठकीत निर्णय होतो. त्यानंतर पुनस्र्थापना देण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी म्हणजे, महसूल विभाग कर्मचार्‍यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तलाठय़ांसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून आदेश दिले जातात. इतर विभागासाठी त्यांचे कार्यालय प्रमुख नियुक्ती प्राधिकारी म्हणूून आदेश देतात.तलाठी संवर्गात अकार्यकारी पदे नाहीत. तहसील स्तरावर दोन-तीन पदे असतात; मात्र कारवाई झालेल्यांची संख्या मोठी असल्याने तलाठय़ांना त्याच पदावर दिले जाते. या मुद्यावर शासन स्तरावर विचार सुरू आहे. - श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.