अकोला: १0 हजार रुपयांची लाच स्वीकारणारे आकोट नगर परिषदेतील अभियंता व्ही.सी. बोरकर यांच्यासह लिपिक किशोर येळणे, शिपाई संजय र्मदानी यांना शुक्रवारी निलंबित करण्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झाली. आकोट नगर परिषदेतील अभियंता व्ही.सी. बोरकर यांनी कबुतरी मैदानामध्ये आनंद मेळावा लावण्यासाठी तक्रारकर्त्याकडून १0 हजार रुपयांची लाच मागितली. वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी १२ नोव्हेंबर २0१४ रोजी सापळा लावून अभियंता बोरकर यांना लाच स्वीकारता रंगेहात अटक केली. बोरकर याच्यासोबत लिपिक किशोर येळणे, शिपाई संजय र्मदानी यांचाही यात समावेश होता.
लाचखोर अभियंत्यासह दोघे निलंबित
By admin | Updated: February 14, 2015 01:25 IST