शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांतील नुकसानाचे सर्वेक्षण सुरू!

By admin | Updated: March 18, 2017 02:49 IST

अवकाळी पाऊस; अहवाल सादर करण्याचा जिल्हाधिका-यांचा आदेश.

अकोला, दि. १७- अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जिल्ह्यातील बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यात झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण शुक्रवारपासून सुरू करण्यात आले असून, नुकसानाचा अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला.जिल्ह्यात गुरुवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. प्राथमिक अहवालानुसार बाश्रीटाकळी तालुक्यात १८ गावांमध्ये आणि पातूर तालुक्यातील १६ गावांमध्ये पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पातूर तालुक्यात गहू, हरभरा, कांदा, संत्रा व आंबा इत्यादी पिकांसह काही घरांचे नुकसान झाले असून, बाश्रीटाकळी व बाळापूर तालुक्यात पिकांच्या नुकसानासह काही घरांचे नुकसान झाले. या पृष्ठभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तीन तालुक्यांतील पीक नुकसानासह घरांच्या नुकसानाचे सर्वेक्षण तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सुरू करण्यात आले. शेतातील पिकांचे नुकसान आणि घरांच्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण करून, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर तहसीलदारांना दिला. त्यानुषंगाने अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागातील नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाश्रीटाकळी, पातूर व बाळापूर या तीन तालुक्यात नुकसान झाले. नुकसानाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सर्वेक्षण पूर्ण करून, नुकसानाचा अहवाल सादर करण्याचा आदेश तीनही तहसीलदारांना देण्यात आला.- श्रीकांत देशपांडेनिवासी उपजिल्हाधिकारी