शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:37 IST

अकोला : अकोला महापालिकेअंतर्गत फेरीवाला धोरण सुरू करण्यासाठी मनपाने मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे . या सर्वेक्षणाची प्रक्रीया गुरूवारी दि.७ मार्चपासून सुरू झाली आहे.

अकोला : अकोला महापालिकेअंतर्गत फेरीवाला धोरण सुरू करण्यासाठी मनपाने मोबाईल अ‍ॅपद्वारे सर्वेक्षण सुरू केले आहे . या सर्वेक्षणाची प्रक्रीया गुरूवारी दि.७ मार्चपासून सुरू झाली आहे. अकोलेकरांनी या मोबाईल अ‍ॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, यांच्या माध्यमातून ठाणे येथील एजन्सी नेमण्यात आली असून लवकरच अकोला शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या रत्यावर पथारी टाकून आणि हातगाड्या लावून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या लघु व्यवसायीकांनी सुरू असलेला मोबाईल नंबर जोडावा. विशेष म्हणजे हा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तसेच फेरीवाला/विक्रेता हा अकोला शहराचा रहिवासी असणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या वेळी फेरीवालाचे वय १४ वर्षार्पेक्षा कमी असू नये. त्यांचेकडे मनपाच्या बाजार विभागामार्फत नेमलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावर विक्री करण्यासाठी आकारण्यात आलेल्या २०१४ पूर्वीच्या शुल्काची पावती, रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र व विधवा अथवा परित्यक्ता असल्यास त्यासबंधित पुरावे असणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाअंती या फेरीवाल्यांसाठी महानगर पालिका अकोलाच्या वतीने आराखडा तयार करून त्यांना मुलभूत सुविधा व त्याची क्षमता बांधणी करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी फेरीवाला यांनी अ‍ॅपचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका