शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा पुरवठा होणार बंद

By admin | Updated: November 7, 2016 02:51 IST

आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक नसलेल्या शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल थांबविण्यात येणार आहे.

अकोला, दि. ६- गेल्या काही वर्षांत रॉकेलच्या कोट्यात झपाट्याने कपात केल्यानंतर आता एक किंवा दोन गॅसधारक असा भेदभाव न करता सर्वांचे रॉकेल बंद करण्याची तयारी शासनाने चालवली आहे. चालू महिन्यात आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक नसलेल्या शिधापत्रिकाधारकांचे रॉकेल थांबविण्यात येत आहे. अनुदानित दरात मिळणार्‍या रॉकेलचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर सुरू होता. ही बाब पुढे करून शासनाने २00८-0९ पासूनच रॉकेल पुरवठय़ात विविध कारणाने कपात केली. त्यातच दोन गॅस सिलिंडरधारकांचे रॉकेलही बंद करण्यात आले. त्यानंतर एक सिलिंडर असलेल्यानांही त्या लाभापासून वंचित ठेवण्याची तयारी आता पूर्ण होत आहे. त्यासाठी शासनाने १३ ऑक्टोबर २0१६ रोजी आदेशही दिला आहे. सध्या रॉकेलचा लाभ घेणार्‍यांचे आधार कार्ड, मोबाइल क्रमांक गोळा करा, ती यादी ३0 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार्‍यांनाच १ नोव्हेंबरनंतर रॉकेल द्या, असेही निर्देश दिले. दरम्यान, ज्या लाभार्थींनी ३१ जानेवारी २0१७ पर्यंत आधार कार्ड, मोबाइल क्रमांक दिले नाहीत, त्यांचा रॉकेल पुरवठा कायमचा बंद केला जाणार आहे. गॅसधारकांच्या कागदपत्रांशी जुळवणीएक सिलिंडरधारकांना सध्या रॉकेलचा पुरवठा केला जात आहे. त्यांचे आधार कार्ड व पासबुक गॅसजोडणीसोबतच्या कागदपत्रासोबत जुळवणी केली जाणार आहे. त्यातून गॅसचे अनुदान घेणार्‍यांना आता अनुदानित रॉकेल देऊ नये, असेच शासनाचे धोरण आहे. त्या जुळवणीसाठीच ही माहिती गोळा केली जात आहे.शिधापत्रिकाधारकांची सतत डोकेदुखीआतापर्यंत विविध कारणांसाठी शिधापत्रिकाधारकांकडून आधार कार्ड, बँक पासबुकची माहिती घेण्यात आली. आता पुन्हा तीच माहिती तातडीने घेण्याचे आदेश आहेत. या प्रकाराला दुकानदारांसह रॉकेल परवानाधारक, लाभार्थीही कंटाळले आहेत.ऑनलाइन यादीतही गोंधळपुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांची आधार लिंकिंग करून यादी ऑनलाइन तयार असल्याचे याआधीच म्हटले आहे. ते काम ८५ टक्के पूर्ण झाल्याचाही दावा आहे. ती यादी आधीच तयार असताना पुन्हा आधारची गरजच काय, असा सवाल केरोसिन हॉकर्स युनियनचे अध्यक्ष सय्यद यासिन ऊर्फ बब्बूभाई यांनी केला आहे.शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक व इतर माहिती नमुन्यात भरून देण्यासाठी दुकानदारांना प्रतिअर्ज पाच रुपये शासनाने दिले; मात्र ते अद्यापही दुकानदारांना मिळालेले नाहीत. - शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष, दुकानदार संघटना.