शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयावर दलालांचा कब्जा

By admin | Updated: June 10, 2016 02:18 IST

राजरोस करतात गोरगरीब रुग्णांची लुबाडणूक, पोलीस कारवाईचाही प्रभाव शून्य.

अकोला: गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामध्ये दलालांचा मुक्त संचार वाढला आहे. रुग्णालयावर त्यांनी कब्जाच केल्याचे एकंदर चित्र दिसून येते. गुरुवारी ह्यलोकमतह्णने सर्वोपचार रुग्णालयात वावरणार्‍या दलालांचे ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण केले. यादरम्यान दलाल राजरोसपणे रुग्णालयातील विविध विभागांमध्ये वावरताना दिसून आले. अनेकदा पोलिसांत तक्रार केल्यानंतरही दलालांवर काहीही परिणाम झालेला नाही. नोकरदार, विद्यार्थी यांसोबतच सामान्य नागरिकांची दलालांच्या माध्यमातून मोठी आर्थिक लुबाडणूक होत आहे. या दलालांविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी अनेकदा पोलिसांत तक्रार केली; परंतु पोलीस दलालांना पकडून तात्पुरती प्रतिबंधात्मक कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी दलाल सर्वोपचार रुग्णालयात पुन्हा सक्रिय होतात. नागरिकांना वैद्यकीय परिपूर्ती देयक, शारीरिक क्षमता प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आदींची गरज असते. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयामध्ये ते येतात. ही प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी याच परिसरात सक्रिय असलेले दलाल त्यांना हेरतात. त्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे सांगत हजारो रुपये हे दलाल त्यांच्याकडून उकळतात. नागरिकही काम लवकर व्हावे म्हणून या दलालांच्या आमिषाला बळी पडतात. येथील अनेक कर्मचार्‍यांसोबत या दलालांचे लागेबांधे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून फिटनेस प्रमाणपत्र व वैद्यकीय परिपूर्ती देयकाची कामे होतात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून अंपगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते; परंतु हे दलाल नागरिकांना या कार्यालयापर्यंंतच पोहोचूच देत नाहीत. त्यांची गरज ते बाहेरच भागविण्याचा प्रयत्न करतात. पैसे घेऊनही अनेकदा नागरिकांना प्रमाणपत्रे मिळत नाहीत. पैसे जातात आणि कामही होत नाही. यामुळे अनेक जण अधिष्ठातांकडे तक्रारी करतात.