शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सूर्य ओकतोय आग!

By admin | Updated: April 16, 2017 21:39 IST

अकोला- पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत असून, रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले.

अकोला@ ४५ : उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळअकोला : एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरू होताच सूर्याने अक्षरश: आग ओकण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गत दोन दिवसांपासून पारा सातत्याने चढत असून, रविवारी अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले. उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ होत असून, आणखी दोन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.यावर्षीचा उन्हाळा मागील सर्व विक्रम मोडीत काढणार, असा कयास हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. तो कयास आता खरा ठरताना दिसत असून, यावर्षी मार्च महिन्यातच पारा ४४ अंश सेल्सिअसवर गेला होता. मध्यंतरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ४०-४२ अंश सेल्सिअसच्या घरात राहिले. गत चार दिवसांपासून मात्र उष्णतेची लाट पसरल्याने तापमापीतील पारा झपाट्याने वर सरकला आहे. शुक्रवारी अकोला शहराचे तापमान राज्यात सर्वाधिक ४४.५ अशं सेल्सिअस होते. शनिवारी ४४. ६ अंशांची नोंद झाली. रविवारी सूर्य आणखीनच तेजाळल्याने ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी दुपारी उन्हाची प्रखरता एवढी होती, की शहरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र सगळीकडे दिसत होते. संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याने नागरिकांची होरपळ होत असून, उन्हाच्या दाहकतेने जीवाची काहिली होत आहे. आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याने पारा आणखी चढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)बाजारपेठा सामसूमउन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक दुपारी १२ वाजेनंतर बाहेर पडेनासे झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक महत्त्वाची कामे सकाळीच उरकून घेण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्यामुळे या कालावधीत रस्ते व बाजारपेठा निर्मनुष्य होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.पाऱ्याचा चढता आलेखगुरुवार - ४४.१शुक्रवार - ४४. ५शनिवार - ४४.६रविवार - ४५.०