शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

सुकन्या योजनेला घरघर

By admin | Updated: June 7, 2014 00:17 IST

निधीअभावी योजना रखडली : पश्‍चिम विदर्भात शेकडो प्रस्ताव पडून

सिद्धार्थ आराख / बुलडाणानवजात मुलींची होणारी हत्या थांबविण्याबरोबरच मुलींना चांगले शिक्षण घेता यावे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शासनाने सुकन्या योजना सुरू केली आहे; मात्र योजना सुरू होऊन सहा महिने उलटले तरी योजनेचा पैसा न आल्याने बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यात या योजनेचा एकाही लाभा र्थ्याला लाभ मिळाला नाही.गर्भात होणारी मुलींची हत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुलींबाबत समाजात सकारात्मक विचार निर्माण व्हावा, बालविवाह नियंत्रणात राहावे, मुलींचा जन्मदर वाढावा या बरोबरच गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास त्या आई- वडिलांना ती बोझ वाटू नये त्यासाठी सुकन्या योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने या मुलींच्या शिक्षण व आरोग्यासाठी काही प्रमाणात वाटा उचलला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकेकडे किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो. दारिद्रय़रेषेच्या खाली असलेल्या कुटुंबाच्या घरी मुलगी जन्मास आल्यास त्या मुलीच्या नावे राज्य शासन आयुर्विमा महामंडळात २१ हजार २00 रुपये जमा करणार आहे. ही रक्कम त्या मुलीच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत म्हणजे ती सज्ञान होईपर्यंत जमा राहील. १८ व्या वर्षी त्या मुलीला एकरकमी सुमारे १ लाख रुपये मिळतील. म्हणजे तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी ही रक्कम कामी येईल. गरीब व दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी अत्यंत चांगल्या असलेल्या या योजनेवर मात्र राज्य शासनाने अद्याप निधीच उपलब्ध करून न दिल्याने ही योजना केवळ नावापुरतीच उरली आहे. बुलडाणा, अकोला वाशिम जिल्ह्यात या योजनेचे शेकडो प्रस्ताव तयार आहेत. बुलडाणा येथील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात आतापर्यंत ३0 प्रस्ताव तयार आहेत. तर अकोला येथील महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाने आतापर्यंत ४0 प्रस्ताव तयार केले आहेत. वाशिम जिल्ह्यातसुद्धा २५ प्रस्ताव तयार आहेत. या प्रस्तावाचे पुढे काय करायचे, याच्या स् पष्ट सूचना संबंधित अधिकार्‍यांना राज्य शासनाकडून मिळाल्या नाहीत. शासनाने योजना तर सुरू केली; मात्र कोणतेही मार्गदर्शक तत्त्व ठरवून न दिल्याने अधिकारी संभ्रमात आहेत. तर या योजनेवर अद्यापपर्यंत निधीच उपलब्ध नसल्यामुळे या प्रस्तावाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.अशी आहे सुकन्या योजनाया जन्मत:च मुलीच्या नावे राज्य शासनाकडून २१ हजार २00 रुपये आयुर्विमा महामंडळाकडे जमा करण्यात येतात. वयाच्या १८ व्या वर्षी सदर मुलीच्या नावाने एक लाख रुपये जमा होत होतात. या अंतर्गत १८ वर्षापूर्वी लग्न न करण्याचे बंधन घालण्यात आले असून सदर पैसे वयाच्या १८ वर्षानंतरच काढता येते. आहे. योजनेचा लाभ दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना देण्यात येतो. या योजनेसाठी केवळ दोन अपत्यांवर कुटुंबनियोजन करण्याची अट टाकण्यात आली आहे. जनजागृतीचा अभावया योजनेबाबत प्रशासनाने नागरिकांमध्ये फारशी जनजागृती केली नाही. त्यामुळे योजनेपासून लाभार्थी वंचित राहात आहेत. बुलडाणा जिल्ह्यात दारिद्रय़रेषेखालील लाखो कुटुंबे आहेत. यातील मुलींना या योजनेचा लाभ झाला असता; मात्र शासन व प्रशासनानेही योजनेच्या जनजागृतीबाबत फारशी काळजी घेतलेली दिसत नाही. जनजागृतीसाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.