शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तीन कर्जबाजारी शेतक-यांच्याआत्महत्या

By admin | Updated: March 14, 2015 01:38 IST

अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील घटना.

अकोला: सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे अकोला व बुलडाणा जिल्ह्यात तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील शेतकरी दयाराम घटे यांनी गुरुवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापिकी आणि सोसायटीचे ६0 हजार रुपयाचे कर्ज यामुळे घटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, १ मुलगा, एक मुलगी व नातवंड असा आप्त परिवार आहे. आत्महत्येच्या दोन घटना घटना बुलडाणा जिल्ह्यात घडल्या. बुलडाणा तालुक्यातील कुलमखेड येथे घडली. ज्ञानेश्‍वर पुंडलिक कानडजे (वय ४५) या शेतकर्‍याने गुरुवारी रात्री विषारी किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. सततची नापीकी, जमीन आणि मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. यामध्ये महाराष्ट्र बँकेच्या चांडोळ शाखेचे ५0 हजार रूपये कर्ज असल्याची माहीती आहे. कर्जापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, आई वडिल असा आप्त परिवार आहे. अमडापूर जवळ असलेल्या हराळखेड येथील एका ६७ वर्षीय शेतकर्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मार्च रोजी घडली. सोनाजी गवई यांच्याकडे ढुमा शिवारामध्ये गट नंबर २४२ मध्ये १.६२ आर ४ एकर शेती असून त्यांच्याकडे स्टेट बँकेचे कर्ज असल्याचे ना तेवाईकांनी सांगितले. १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला आत्माराम गवई यांनी स्वत:च्या घरातील लाकडी बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.