अकोला: कौलखेडमधील बलोद लेआउटमध्ये राहणार्या यमुनाबाई तुळशीराम सरोदे (५0) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यमुनाबाई सरोदे यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांनी गळफास काढून तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: May 6, 2017 02:50 IST