अकोला, दि. 0१ - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये बीएसस्सी अँग्रिकल्चरचा विद्यार्थी असलेल्या एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघड झाली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.उमरी येथील रहिवासी गणेश नावकार हा युवक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालयात बीएसस्सी कृषीच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. शुक्रवारी दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेशच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर गणेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयामध्ये पाठविला. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Updated: October 2, 2016 02:43 IST