शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आरोग्य कर्मचा-याची विष प्राशन करून आत्महत्या!

By admin | Updated: September 16, 2016 02:56 IST

बुलडाणा सामन्य रुग्णालयातील कर्मचार्‍याने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

बुलडाणा, दि. १५ - येथील सामान्य रुग्णालयात 'ब्रदर' म्हणून कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचार्‍याने स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना आज १५ सप्टेंबर रोजी हतेडी येथे घडली. या घटनेमुळे आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील हतेडी येथील मूळ रहिवासी असलेला पवन मल्हारी इंगळे वय २४ हा येथील सामान्य रुग्णालयात ब्रदर म्हणून कार्यरत होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्याने गावातील स्वत:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. या घटनेची माहिती काही वेळातच त्याच्या नातेवाइकांना मिळाली. माहिती मिळताच नातेवाइकांनी त्याला येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात भरती केले; परंतु शरिरात विष जास्त झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.