चिखलगाव (अकोला) : कर्जबाजारीपणास कंटाळून बाश्रीटाकळी तालुक्यातील वरखेड वाघजाळी ये थील एका शेतकर्याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २६ मार्च रोजी रात्री घडली. वरखेड वाघजाळी येथील पुंडलीक संपत पवार या ५७ वर्षिय शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून २६ मार्च रोजी रात्री शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसर्या दिवशी सकाळी मुलांनी शोधाशोध सुरू केली असता, त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला.
कर्जबाजारीपणास कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: March 28, 2015 02:07 IST