तेल्हारा - येथील एका तरू णाने चक्क स्मशानभूमीत आत्महत्या केल्याची घटना १२ जून रोजी घडली. राहुल लक्ष्मण गवई वय २३ असे मृतकाचे नाव आहे. तेल्हारा शहरातील सुपीनाथ नगरात राहणार्या राहुलने स्मशानभूमीत झाडाला गळफास घेतला. हा प्रकार दुपारी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.
स्मशानभूमीत आत्महत्या
By admin | Updated: May 12, 2014 20:15 IST