शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:14 IST

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. ...

अकोला: गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले असून, त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावी व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविड १९ काळात यामध्ये काही अडथळे येत असले, तरीही अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यामार्फत लाभार्थींपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्या वतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून, खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या निर्णयामुळे लाभार्थींमध्ये रोष व्यक्त होत आहे.

---------------------------

पूरक पोषण आहारात काय काय मिळते?

- ६ महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थ्यांना गहू २,८०० ग्रॅम,

- चवळी १,५०० ग्रॅम

- मसूर १,५०० ग्रॅम या व्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थींना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

---------------------------

पुरक पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्यस्थितीत १६,४५१ लाभार्थींना घरपोच पूरक पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. प्रत्येक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल, यासाठी आमचा प्रयत्न असतो. पूरक पोषण आहारामध्ये यापूर्वी खाद्यतेल देण्यात येत होते. मात्र, आता त्याऐवजी साखर वाटप करण्यात येत आहे.

-विलास मरसाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. अकोला.

----------------------------

कोरोनाच्या संकट काळात अनेक जण आर्थिक संकटात आहेत. अशातच शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल.

- ........

--------------------------

शासनाने तेलाऐवजी साखर देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. महागाई वाढत चाललेली असताना, सरकारची ही काटकसर कशासाठी सुरू आहे.

- ...............

----------------------------------

शासनाची पोषक आहार योजना ही खरोखरच कौतुकास्पद आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरळीत होत आहे. मात्र, या योजनेतील दिले जाणारे घटक वाढविण्याऐवजी कमी करणे ही सरकारची लाभार्थींप्रतिची भूमिका योग्य नाही.

-..................

--------------------------------------

पूरक पोषक आहार योजनेचे एकूण लाभार्थी- ६९,४६०

सहा महिने ते ३ वर्षे वयोगटांतील लाभार्थी- ५३,००९

जिल्ह्यातील एकूण गरोदर महिला- ८,८६०

जिल्ह्यातील एकूण स्तनदा माता- ७,५९१