शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

श्रीलंका विरूध्दच्या सामन्यात सुफियानची हॅट्रीक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 20:31 IST

श्रीलंका विरूध्दच्या सामन्यात सुफियानची हॅट्रीक!

नीलिमा शिंगणे-जगडअकोला: इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या ४७ वी शालेय आशियाई फु टबॉल स्पर्धेत अकोल्याच्या सुफियान शेख याने शुक्रवारी श्रीलंका विरू ध्द झालेल्या सामन्यात हॅट्रीक करू न भारताला विजय मिळवून दिला. भारतीय संघाचा सामना शुक्रवारी श्रीलंका संघासोबत झाला. चुरशीच्या या सामन्यात भारताने ५-२ गोलने विजय मिळविला. विशेष म्हणजे अकोल्याच्या सुफियान शेख याने या सामन्यात सलग ३ गोल करू न हॅट्रीक साधली. दिल्लीच्या अमन सिंग याने २ गोल केले. मंगळवारी सिंगापुर संघासोबत झालेल्या सामन्यात सुफियानने २ गोल करू न भारताला विजय मिळवून दिला होता. सुफियानने आपल्या दमदार खेळामुळे भारतीय फुटबॉल क्रीडा विश्वाचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. एकीकडे भारताचा वरिष्ठ फुटबॉल संघ फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ साठी पात्रता सिध्द करू शकला नाही. तर दुसरीकडे भारतीय शालेय फुटबॉल संघ आपल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे फुटबॉलप्रेमींची मने जिंकत आहे.सुफियानने फुटबॉलचे प्राथमिक धडे आपले आजोबा संतोष ट्राफी प्लेअर चांद शेख, वडिल फहिम शेख, तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे प्रशिक्षक अब्दुल रउफ यांच्याकडे गिरविले. सुफियान हा फुटबॉलमध्ये शेख घराण्यातील चवथ्या पिढीचे नेतृत्व करीत आहे. अकोल्यातील लाल बहादुर शास्त्री क्रीडांगणावर सुफीयान खेळायचा. अलीकडे सुफियानने राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत स्वर्णीम कामगिरी केली. सुफीयान अकोल्याती सेंट अ‍ॅन्स स्कुलचा विद्यार्थी होता. यानंतर त्याची निवड क्रीडा प्रबोधिनी बालेवाडीकरिता झाली. प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्या प्रशिक्षणात अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुफियाने आपले कौशल्य प्रदशर््िात केले. खेलो इंडिया स्पर्धेतही सुफियानच्या खेळीमुळे महाराष्ट्राला विजेतेपद मिळाले. अकोल्यात आनंद साजराअकोल्याचा फुटबॉलपटू सुफियान शेख याने आज श्रीलंका विरू ध्द झालेल्या सामन्यामध्ये हॅट्रीक साधली. ही आनंदी वार्ता अकोला क्रीडाक्षेत्रात पसरली. ज्येष्ठ,वरिष्ठ फुटबॉलपटू तसेच पोलिस विभागातील फुटबॉलपटूंनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. राजिक खान, धीरज चव्हाण, संजय मैंद, संजय पटेकर, बुढन गाडेकर, राजकुमार तडस, संजय बैस, दीपक किल्लेदार, दीपिका सोनार, प्रा.सागर नारखेडे, साद खान, सोहेल शेख, विन्सेंट अमेर, बी.एस.तायडे, जावेद अली, सईद खान, संजय देशमुख, प्रशांत खापरकर, प्रभाकर रू माले आदींनी सुफीयानच्या चमकदार कामगिरीचे कौतूक करू न पुढील विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
टॅग्स :AkolaअकोलाFootballफुटबॉल