अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळी अवकाळी पाऊस बरसला. शुक्रवारी दिवसभर ४0 डिग्री सेल्सिअस तापमान होते. दिवसभर कडक उन्ह तापल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला व अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे शहरात रस्त्यावर दुकाने थाटणार्या व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली. दुकानातील साहित्य भिजल्याने काही व्यावसायिकांचे नुकसानही झाले. अकोला शहरासह विविध तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात शेतकर्यांची पिके काढणीला आली आहे. पिके शेतातच असल्यामुळे पावसाने पिकांचे नुकसान झाले. दोन महिन्यात तिसर्यांदा अवकाळी पाऊस आला.
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा
By admin | Updated: April 11, 2015 01:47 IST