शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाटपात घोळ; अधिका-यांना ‘शो-कॉज’

By admin | Updated: October 25, 2016 03:11 IST

अर्थ, समाजकल्याणचे अधिकारी-कर्मचारी जबाबदार

सदानंद सिरसाट अकोला, दि. २४- जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सप्टेंबर २0१५ नंतर शासन निर्णयांना डावलत वसतिगृहांना अनुदान वाटप करण्यात आले. त्यामध्ये १४ वसतिगृहांना नियमबाहय़ वाटप केल्याची बाब 'लोकमत' ने १९ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केली. या वृत्ताची दखल घेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी , तत्कालीन प्रभारी समाजकल्याण अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह दोन कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सोमवारी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील १४ वसतिगृहांना अनुदान वाटप करताना संबंधित अधिकारी-कर्मचार्‍यांनी समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांचे २१ सप्टेंबर २0१५ रोजीचे आदेश बाजूला ठेवण्यात आले. सोबतच त्यासाठी आधीचे म्हणजे, १६ मार्च १९९८, १ ऑगस्ट २00८, २६ नोव्हेंबर २0१३ रोजीचे शासन निर्णयही डावलण्यात आले. शासन निर्णय तर सोडाच, जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी असलेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनाही अंधारात ठेवण्यात आले. ही बाब ह्यलोकमतह्णने उघड केली. मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी या प्रकरणातील तथ्य आणि सद्यस्थिती त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांकडून जाणून घेतली. त्या सर्वांना नियमबाहय़ वाटपाबाबत नोटीस देण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य लेखा व वित्त अधिकारी गिता नागर, त्यावेळी समाजकल्याण अधिकार्‍याचा प्रभार असलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. खिल्लारे, समाजकल्याण विभागाचे अधीक्षक एम.डी. खारोडे, कनिष्ठ सहायक एस.व्ही. हिंगणे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत लाखोंचे अनुदान वाटप करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या ही बाब चांगलीच अंगलट आली आहे.