शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करा!

By admin | Updated: May 17, 2017 02:16 IST

शिवसेना संपर्क प्रमुखांचे निर्देश; शिवसेनेत फेरबदलाचे संकेत

आशिष गावंडे। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीसह महिला संघटन आणि युवा सेना संघटनेत सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची कुंडली सादर करण्याचे निर्देश शिवसेनेच्या पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले आहेत. शिवसेनेची वाटचाल गतिमान करण्यासाठी पक्षात फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमधील युती संपुष्टात आल्यानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना स्वबळावर उदयास आली. युतीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये निर्माण झालेले मतभेद दिवसेंदिवस वाढल्यामुळे की काय, भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधकाची भूमिका निभावणे पसंत केले आहे. त्यानंतर राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद, दहा महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती न करता स्वबळावर लढणे पसंत केले. आगामी दोन वर्षांनंतर लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील. त्यामुळे स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने कर्जमुक्तीचा विषय पुढे करत शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिल्याचे दिसून येते. शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (१५ मे) अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीचा लेखाजोखा घेतला. यावेळी तीनही जिल्ह्यातील संघटनात्मक फेरबदल करण्याचे पक्ष प्रमुखांनी स्पष्ट केले होते. त्या धर्तीवर शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख खा. अरविंद सावंत यांनी पक्षात पदाधिकारी म्हणून मिरवणाऱ्या परंतु कामचुकार आणि गटातटाच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना दिले आहेत. युवा सेनेसाठी हवा तळागाळातील कार्यकर्तायुवा सेनेचे जिल्हाप्रमुख पद रिक्त असून, या पदासाठी शिवसेनेतील पदाधिक ाऱ्यांची मुले, भाऊ, नातेवाईक असे दावेदार समोर केले जात आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या झटकण्यासाठी काम करायचे का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. अशावेळी सर्वसामान्यांमध्ये राहणारा तळागाळातील कार्यकर्त्याला युवा सेनेचे पद देणे पक्षाकडून अपेक्षित आहे.महिला संघटनेबाबत तक्रारींचा पूर!शिवसंपर्क अभियानादरम्यान सेना नेत्यांनी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता महिला संघटनेबाबत अनेक तक्रारी झाल्याची माहिती आहे. महिला संघटन केवळ कागदावर शिल्लक असल्याचे पक्षाला दिसून आले.शहर कार्यकारिणीत होणार बदलशिवसेनेच्या शहर कार्यकारिणीत फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षामध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांसोबतच नवीन कार्यकर्त्यांची फळी उभारली जाणे आवश्यक झाले आहे. त्यानुषंगाने शहर कार्यकारिणीत नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.