शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्वारी’चा अहवाल सादर करा!

By admin | Updated: October 27, 2016 03:36 IST

गोदामातील ज्वारीचे पीठ; जिल्हाधिका-यांचे ‘डीएसओं’ना निर्देश.

अकोला, दि. २६- गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात हमी दराने खरेदी करण्यात आलेली ज्वारी जिल्हय़ातील पाच शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून आहे. गोदामांमध्ये पडून ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित करण्याचा आदेश अद्याप शासनामार्फत देण्यात आला नाही. त्यामुळे गोदामातील हजारो क्विंटल ज्वारीला मोठय़ा प्रमाणात सोंडे लागले असून, पोखरलेल्या ज्वारीचे पीठ झाले आहे. याबाबत बुधवारी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत, शासकीय धान्य गोदामातील ज्वारी साठय़ाची चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारीच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना (डीएसओ) दिले.गतवर्षीच्या खरीप हंगामात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्हय़ातील सातही तालुक्यांत हमी दराने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्यापैकी अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर व बाश्रीटाकळी या पाच खरेदी केंद्रांवर १ हजार ५७0 रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी करण्यात आली. जिल्हय़ातील पाच तालुक्यांत खरेदी करण्यात आलेली ५८ हजार ६२८ क्विंटल ज्वारी गत डिसेंबर २0१५ मध्ये जिल्हय़ातील शासकीय धान्य गोदामांमध्ये साठविण्यात आली. दहा महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेली ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गरीब शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्याचा आदेश शासनामार्फत पुरवठा विभागाला अद्याप देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय धान्य गोदामांमध्ये पडून असलेल्या हजारो क्विंटल ज्वारीच्या पोत्यांमधील ज्वारीमध्ये मोठय़ा प्रमाणात सोंड्यांचा प्रादुर्भाव झाला असून, ज्वारीचे दाणे पोखरल्याने,हजारो क्विंटल ज्वारीचे पीठ झाले आहे. यासंदर्भात ह्यशासकीय धान्य गोदामां तील ज्वारीचे झाले पीठह्ण अशा आशयाचे वृत्त बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हय़ात ग तवर्षीच्या खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेली ज्वारी, शासकीय धान्य गोदामातील ज्वारीचा साठा, ज्वारीची सद्यस्थिती आणि गोदामातील ज्वारी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासन आदेशासंबंधी शासनाकडे करण्यात आलेला पाठपुरावा याबाबत चौकशी करून, अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बुधवारीच जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांना दिले.