शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाखा अभियंत्याविरुद्धच्या तक्रारींची माहिती सादर करा!

By admin | Updated: August 30, 2014 01:08 IST

अकोला जिल्हा परिषद ‘डीसीईओं’चे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या क र्मचार्‍या विरूद्ध तक्रार सादर करण्याचे निर्देश

अकोला : भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मूर्तिजापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता पी.आर. रणबावरे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी (डीसीईओ) शुक्रवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत मूर्तिजापूर पंचायत समितीचे शाखा अभियंता रणबावरे यांनी मुलाच्या नावाने निविदा काढून व त्याला कामे देऊन कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गत २२ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला होता. तसेच रणबावरे यांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत अनेक तक्रारी असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानुषंगाने शाखा अभियंता रणबावरे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीदेखील स्थायी समितीच्या सभेत गठित करण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर रणबावरे यांच्याविरुद्ध प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले.