अकोला: जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या इमारतींची माहिती सादर करण्याचे आदेश नायब तहसीलदार बी.झेड. सोनोने यांनी अधिकार्यांना शनिवारी दिले. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात विभाग प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी बैठकाही घेतल्या. बैठकांमध्ये अधिकार्यांनी कर्मचार्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. तसेच मतदार नोेंदणीसाठीही प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महसूल आणि पोलिस अधिकार्यांनी खदान परिसरातील शासकीय गोदामाचीही पाहणी केली. खोदान अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघाची म तमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने सोयी-सुविधा, डागडुजीचाही आढावाही घेण्यात आला होता. अधिकार्यांनी कर्मचार्यांच्या आवश्यक त्या सूचनाही दिल्या होत्या. दरम्यान राजयत यंदा होऊ घालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात अधिकारी व कर्मचार्यांसाठी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. मतदान केंद्र इमारतींची दुरुस्ती करावयाची असल्यास तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकार्यांनी बैठकीत दिल्या. ग्रेड पेनुसार चतुर्थ कर्मचार्यांसह श्रेणीनुसार कर्मचार्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मतदान केंद्र इमारतींची माहिती सादर करा-प्रशासनाचे आदेश
By admin | Updated: September 8, 2014 00:10 IST