शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील योजनांचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:17 IST

अकोला: मनपा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना, अमृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

अकोला: मनपा क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना, अमृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुंठेवारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, भूमिगत गटार योजना, शौचालय योजनेत झालेली अनियमितता या सर्व प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी मनपा अधिकार्‍यांना दिले. शुक्रवारी आ. बाजोरियांनी मनपा आयुक्त निमा अरोरा व अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली.

महानगरपालिकेतील अनागोंदी कारभाराबाबत नेमलेल्या उपसमितीच्या पत्रव्यवहाराला मनपा प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्याने आमदार गोपिकिशन बाजोरियांनी शुक्रवारी मनपा आयुक्त निमा अरोरा तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अमृत योजनेच्या कामांचा कालावधी संपला परंतू काम अर्धवट आहे. गुंठेवारीची प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढणे, भूमिगत गटार योजना, शौचालय योजनेत झालेली अनियमितता या सर्व प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आ. गोपिकिशन बाजोरिया यांनी अधिकार्‍यांना आढावा बैठकित दिले. शहरातील 5 हजार 902 लाभार्थीची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अंतिम निवड झाली आहे. घरकुलांसाठी मंजूरी मिळाली असली तरी गुंठेवारी जमिनीच्या संदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. दरम्यान, 2 हजार 470 घरे गुंठेवारीत आहेत. ही प्रकरणे लवकर निकाली काढण्याचे निर्देश आ. बाजोरिया यांनी आढावा बैठकित दिले. तसेच लाभार्थीच्या जागा नियमानुकुल करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्याबाबात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. बाजोरियांनी मनपा अधिकार्‍यांना दिले. बैठकित कॅनॉल रोडच्या प्रस्तावाबात माहिती सादर करण्यात यावी तसेच 2 कोटीचा निधी का परत गेला, या कारणांची शहाणीशा करा. तसेच कॅनॉल रोडचे महसूलकडून तात्काळ आरक्षण काढून रस्त्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश आ. बाजोरियांनी दिले. शहराच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी अधिकार्‍यांना दिले. शौचालय योजनेची शासन आदेशानुसार कार्यवाही प्रशासनाकडून झाली नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या जागा मनपाच्या हद्दीत येतात त्या ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही आ. बाजोरियांनी यावेळी दिले. आढावा बैठकिला आयुक्त निमा अरोरा, उपायुक्त पंकज जावळे, वैभव आवारे, अजय गुजर, नगररचनाचे प्रभारी सहायक संचालक गोवर्धन वाघाडे, प्रभारी नगररचनाकार संजय नाकोड आदींची उपस्थिती होती.

आवास योजनेची पीएमसीची जबाबदारी

पंतप्रधान आवास योजनेची अमंलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने 3.5 कोटी रूपये नेमलेल्या प्रकल्प व्यवस्थापन समितीला दिले आहेत. लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी पीएमसीची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे आढवा बैठकित आ. बाजोरियांनी अधिकार्‍यांना सांगितले.

अवैध बांधकामावर काय कार्यवारी केली?

महानगरपालिका हद्दीत 186 अवैध इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रशासनाने अवैध बांधकामाबाबत काय कार्यवाही केली. त्यांचा अहवाल सादर करण्याचे अधिकार्‍यांना यावेळी आ.बाजोरियांनी सांगितले.

दंड वसूलीसाठी कोणते मापदंड?

रिलांयन्स कंपनीकडून 24 कोटी 6 लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती मनपा अधिकार्‍यांनी दिली. मात्र यासाठी कोणते मापदंड लावले ? याबाबतची विचारणा आ.बाजोरियांनी अधिकार्‍यांना केली. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.