शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवि विभाजनाचा मुद्दा अधांतरी!

By admin | Updated: January 25, 2016 02:05 IST

बी. वेंकटेश्‍वरलू अभ्यास समितीचा अहवाल सादर; शासन संसाधने व इतर साधने तपासणार.

राजरत्न सिरसाट/अकोला: अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा जोतिबा फुले राहुरी कृषी विद्यापीठ विभाजनाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या डॉ. बी. वेंकटेस्वरलू अभ्यास समितीने शासनाला अहवाल सादर केल्यांनतर या दोन्ही कृषी विद्यापीठांच्या विभाजनासंदर्भातील चर्चेला वेग आला आहे. दरम्यान, शासन कृषी विद्यापीठासाठी लागणारे संसाधने व इतर आवश्यक बाबी तपासणार आहे.विदर्भातील एकमेव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करू न पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासंदर्भात तत्कालीन आघाडी शासनाने डॉ. वायपीएस थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठन केले होते. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला होता. तथापि, सत्ता बदल झाल्यानंतर युती शासनाने नव्याने कृषी विद्यापीठ विभाजन समिती स्थापन केली. स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेस्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या अभ्यास समितीने आपला अहवाल ३१ डिसेंबर रोजी शासनाला सादर केला आहे. त्यानंतर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या कृषी विद्यापीठात विभाजनाच्या चर्चेने जोर धरला आहे. १५ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा निकाली निघेल ही चर्चादेखील होती; परंतु कृषी विद्यापीठाचे विभाजन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागत असल्याने सध्यातरी कृषी विद्यापीठाचे विभाजन अशक्य असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दरम्यान, कृषी विद्यापीठाच्या विभाजनाचा अहवाल वेंकटेस्वरलू समितीने दिला असला तरी या विद्यापीठाच्या विभाजनाला या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व विदर्भातील इतर तज्ज्ञांचा विरोध आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करू न नव्याने निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाला जागा नसून, बुलडाण्याच्या मॉडेल कॉलेजचे प्रकरण असेच आहे. विद्यापीठ निर्मिती करणे म्हणजे मोठा खर्चाचा भाग आहे. शासनाकडे सध्या पैसा नाही तर कृषी विद्यापीठाचे विभाजन करणार कसे, असा प्रश्न या निमित्ताने तज्ज्ञाक डून उपस्थित केला जात आहे. दहा लाख हेक्टरच्या आत क्षेत्र असलेल्या भागाला स्वतंत्र विद्यापीठ देणे सोयीस्कर आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.