शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘सब डिव्हिजन’ची कोंडी कायम; आयुक्तांनी गुंडाळला जनता दरबार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:17 IST

सुरुवातीला एक-दोन आठवडे प्रस्ताव निकाली काढल्यानंतर आयुक्तांनी जनता दरबार गुंडाळला.

अकोला: शहरातील लहान भूखंडांच्या उपविभाजना(सब डिव्हिजन)च्या प्रस्तावांना मनपाकडून मंजुरी दिली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना घराचे बांधकाम करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. ही कोंडी फोडण्याचे काम महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी करीत सब डिव्हिजनच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी दर बुधवारी नगररचना विभागात जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला एक-दोन आठवडे प्रस्ताव निकाली काढल्यानंतर आयुक्तांनी जनता दरबार गुंडाळला. यामुळे हा दरबार आयुक्तांनी पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा सर्वसामान्य अकोलेकरांकडून व्यक्त केली जात आहे.तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळापासून ते आजपर्यंत अकोलेकरांनी बांधकाम परवानगीसाठी महापालिके च्या नगररचना विभागात दाखल केलेल्या प्रस्तावांची संख्या तपासल्यास शहराची लोक संख्या व ‘जीआयएस’द्वारे मालमत्तांचे मोजमाप केल्यानंतर प्राप्त प्रस्तावांमध्ये मोठी तफावत आहे. अर्थात, लहान भूखंडधारकांनी नकाशा मंजुरीसाठी महापालिकेत होणारी पायपीट व सब डिव्हिजनच्या तांत्रिक कारणामुळे मिळणारा नकार लक्षात घेता बांधकाम परवानगी न घेताच लहान घरांचे बांधकाम केल्याचे चित्र आहे. नगररचना विभागात वर्षाकाठी सुमारे एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम परवानगीचे प्रस्ताव दाखल होतात. सब डिव्हिजनचे निकष, नियम क्लिष्ट असल्याने लहान भूखंडधारकांचे प्रस्ताव नाइलाजाने बाजूला सारल्या जातात. त्यामुळे हक्काचे घर बांधण्यापासून संबंधितांना वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा लहान भूखंडधारकांनी नकाशा मंजुरीच्या चक्रव्यूहात न अडकता तसेच परवानगी न घेताच घराचे बांधकाम केल्याची परिस्थिती आहे. साहजिकच, अशा नागरिकांकडे बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता तसेच अनधिकृत बांधकामाला चाप लावण्याच्या दुहेरी उद्देशातून यापुढे सब डिव्हिजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला होता. त्याकरिता दर बुधवारी नगररचना विभागात जाऊन सब डिव्हिजनचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. आयुक्तांच्या या निर्णयामुळे असंख्य लहान भूखंडधारक मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला होता. सुरुवातीला एक-दोन आठवडे प्रस्ताव निकाली काढल्यानंतर हा दरबार गुंडाळण्यात आल्याचे समोर आले.

...म्हणून दरबार सुरू करावा!लहान भूखंडांच्या सब डिव्हिजनच्या प्रस्तावांना मनपाकडून मंजुरी मिळत नसल्याचे पाहून नागरिक परस्पर भूखंडांची खरेदी-विक्री करतात. सब डिव्हिजन नसल्यामुळे नकाशा मंजूर होत नाही. परिणामी, बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. अशा नानाविध अडचणीत सापडलेले भूखंडधारक अवैधरीत्या घराचे बांधकाम करीत असल्याने त्यावर उपाय म्हणून सब डिव्हिजनच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची गरज आहे. यासाठी आयुक्तांनी पुन्हा जनता दरबार घेण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका