शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एअर कॉम्प्रेसर पार्श्वभागावर लावल्याने फुगले मजुराचे पोट

By admin | Updated: May 16, 2017 02:13 IST

मस्करी आली अंगलट: एमआयडीसीतील दालमिलमधील प्रकार

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: औद्योगिक वसाहतमधील एका दालमिलमधील मजूर काम आटोपल्यानंतर एअर कॉम्प्रेसरद्वारे अंगावरील आणि कपड्यांवरील धूळ काढत असताना एका मजुराने मस्करी म्हणून अविनाश नामक मजुराच्या पार्श्वभागात एअर कॉम्प्रेसर लावल्याने सदर मजुराच्या पोटात हवा जाऊन त्याचे पोट फुगल्याचा प्रकार रविवारी घडला. पोट फुगल्याने घाबरलेल्या मजुराला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.औद्योगिक वसाहतमधील एका दालमिलमध्ये रविवारी मजुरांचे काम आटोपले होते. दररोजप्रमाणेच अंगावरील आणि कापडांवर असलेला धूळ काढण्यासाठी त्यांनी रविवारी सायंकाळी एअर कॉम्प्रेसरचा वापर केला. पाच ते सहा मजूर एअर कॉम्प्रेसरद्वारे धूळ काढत असतानाच एका मजुराने अविनाश नामक मजुराच्या पार्श्वभागाला एअर कॉम्प्रेसर लावून मस्करी करण्याचा प्रयत्न केला; मात्र पार्श्वभागाद्वारे एअर कॉम्प्रेसरची हवा सदर मजुराच्या पोटात गेल्याने त्याचे पोट प्रचंड फुगले, हा प्रकार पाहून उपस्थित मजुरांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी अविनाशला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रविवारी रात्री अविनाशच्या पोटावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर सोमवारी सकाळी अविनाशचे पोट पूर्वीप्रमाणे सामान्य झाले; मात्र मस्करी म्हणून केलेला प्रकार अविनाशच्या जिवावर बेतणारा होता. तर असा प्रकार करणारे मजूरही अद्यापही घाबरलेले आहेत, कारण सोमवारी दिवसभर अविनाश हा बेशुद्धावस्थेत असल्याने मंगळवारी अविनाश या मजुराचे एमआयडीसी पोलीस बयान नोंदविणार असल्याची माहिती आहे.मस्करी करा जरा सांभाळूनमित्रांमध्ये असताना किंवा कौटुंबिक वातावरणामध्ये विविध प्रकारे मस्करी करण्यात येते; मात्र रविवारी एमआयडीसीत घडलेला प्रकार हा डोळे उघडणारा असून, बोलण्याव्यतिरिक्त करण्यात येत असलेली मस्करी जरा सांभाळून करा, अशी माहिती सदर डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. शरीरासोबत करण्यात येणारी मस्करी ही अंगावर बेतणारी असल्याने प्रत्येकाने अशा प्रकारची मस्करी करणे टाळावे किंवा सांभाळून हे प्रकार करावेत.मजुरावर यशस्वी शस्त्रक्रियाअविनाश नामक मजुरावर खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सदर मजुराचे पोट आता पूर्वीप्रमाणे झाले आहे; मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत मजूर बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मंगळवारी सदर मुजराचे बयान नोंदवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.