शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:23 IST

शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी  करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा,  असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५  शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची  शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतषबाजी न  करण्याचा निर्धार केला. 

ठळक मुद्देप्राथमिक, माध्यमिक शाळांचा समावेश आवाजी फटाके न फोडण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी  करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा,  असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५  शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची  शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतषबाजी न  करण्याचा निर्धार केला. शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वच शाळांमधील  प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घ्यावा, असा  आदेश दिला होता. दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची  आतषबाजी करण्यात येते. या आतषबाजीमुळे पर्यावरणासह  ध्वनिप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होते. यासोबतच ध्वनी व हवेच्या  प्रदूषणामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन, कर्णबधिरता,  श्‍वसनाचे, फुप्फुसाचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे  ध्वनी व हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती  व्हावी, या उद्देशाने जिल्हय़ातील प्राथमिक व माध्यमिक ४४५  शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी यंदाची दिवाळी  प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेतली आणि दिवाळीमध्ये मोठय़ा  आवाजाच्या फटाक्यांची आतषबाजी करणार नाही, असा निर्धार  केला. शासनाने दिलेल्या शपथपत्राचे शाळांमध्ये सामुहिक  वाचन करून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. अकोला तालु क्यातील काही शाळांना माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश  मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, उपशिक्षणाधिकारी देवेंद्र  अवचार, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड, शिक्षण  विस्तार अधिकारी दिनेश दुतंडे यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी  प्रशांत दिग्रसकर यांनी भेटी दिल्या. 

टॅग्स :diwaliदिवाळी