अकोला : न्यू खेतान नगर भागातील ज्ञानदर्पण शाळेच्या विद्यार्थ्यांंनी शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसचे पाण्यात विघटन होत नसल्यामुळे त्याचा विपरित परिणाम पर्यावरणावर होत असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींंची प्रतिष्ठापना करून, पर्यावरणाची हानी रोखण्याचा मोलाचा संदेश ज्ञानदर्पणच्या विद्यार्थ्यांंनी दिला आहे. ज्ञानदर्पणच्या विद्यार्थ्यांंनी मुर्तिकार मारमपल्ली यांच्या मार्गदर्शनात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे धडे गिरविले. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने तीनशेपेक्षा अधिक बाप्पाच्या मूर्त्या विद्यार्थ्यांंनी तयार केल्या व आकर्षक रंगांनी सजविल्यादेखील. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे पर्यावरणाचा कशापद्धतीने र्हास होतोय, याबाबत दरवर्षी विविध सामाजिक संस्था, संघटना व निसर्गमित्रांच्या वतीने जनजागृती केली जाते. मात्र, काही केल्या त्याचा वापर करणे बंद झालेला नाही. रासायनिक रंगांमुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका पोहचत आहे. ह्यज्ञानदर्पणह्णच्या विद्यार्थ्यांंनी या सर्व बाबींचा अभ्यास करून, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नावली तयार केली आहे. लवकरच घरोघरी जाऊन ती नागरिकांकडून भरून घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक बाबींची माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याची माहिती संस्थेच्या सचिव पल्लवी कुळकर्णी यांनी दिली. प्रकल्प प्रमुख कुशल सेनाड, शरद वाघ व अंकुश गावंडे यांनी विद्यार्थ्यांंंना मार्गदर्शन केले.
निसर्ग रक्षणासाठी विद्यार्थ्यांंचा पुढाकार
By admin | Updated: August 14, 2014 02:04 IST