शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:31 IST

रोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवसच बाकी राहिले असून, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देनव्या अटींमुळे विद्यार्थ्यांना फटका अनुदानासाठी आता आईचेही खाते क्रमांक लागणार

लोकमत न्यूज नेटवर्करोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवसच बाकी राहिले असून, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी शासनाने शाळा उघडल्यानंतर १५ दिवसातच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले होते; मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन दीड महिना झाला; मात्र अद्यापही गणवेश वाटप झाले नसून, यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. यावर्षी शासनाच्या भोंगळ कारभारामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत गणवेश विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील १४७ प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी ११ हजार ८२ एवढे लाभार्थी संख्य़ा आहे. या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ४४ लाख ३२ हजार ८00 रुपये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे; परंतु यावर्षी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पालकांना फारच हेलपाटे द्यावे लागत आहे. या अगोदर काही विद्यार्थ्यांंनी स्वत: खाते उघडले काही पालकांनी झीरो बॅलन्सवर खाते उघडले; परंतु पालकांनी काढलेले खाते पूर्ण व्यर्थ गेले आता शासनाने नवीन नियम काढला आता विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांंना आईचे खाते काढावे लागणार तसेच पालकांना दुकानामध्ये दोन गणवेश चारशे रुपयात घेऊन त्यानंतर दोन गणवेशासाठी मुख्याध्यापक पैसे काढण्यासाठी चेक देतील; परंतु सध्या ग्रामीण भागात पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. कोवळी पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. तसेच मजुरांना शेतात कामे नाही. मजूर घरीच बसला आहे. हातालाच काम नसल्याने पोट भरावे की विद्यार्थ्यांंना गणवेश आणावा, असे पालकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच तालुक्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांंनी आईचे खातेसुद्धा उघडले नाही. त्यामुळे अजूनही ८0 टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांंना शाळेतच गणवेश वाटप करावे, अशी मागणी होत आहे.  

तालुक्यातील विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात गणवेशासाठी निधी जमा करण्यात आला असून, अनेक पालकांनी बँक खातेसुद्धा काढले नाही. शासनाच्या आदेशानुसार गणवेशाची अनुदानाची रक्कम व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करता येत नाही. - संदीप मालवे, गटशिक्षणाधिकारी, अकोट

 शालेय गणवेश घेण्यासाठी आम्ही पालकांना बँकेत खाते काढण्याच्या सूचना दिल्या तर काही पालकांनी खाते काढले; परंतु आता पुन्हा आईचे खाते काढण्यासाठी पालकांना सूचना दिल्या आहेत. - संदीप व्यक्ते, प्रभारी मुख्याध्यापक, रोहणखेड