शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

विद्यापीठाच्या गुंतागुंतीच्या परीक्षा पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान!

By admin | Updated: May 11, 2017 07:24 IST

विद्यापीठावर ताण: कला, वाणिज्य प्रथम वर्षाची परीक्षा ‘सेमिस्टर’ पद्धतीने.

अकोला : राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयातर्फे घेण्यात येतात आणि अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठ घेते; परंतु आपल्या विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा घेण्याची पद्धत जगावेगळी असून, अत्यंत क्लिष्ट आहे. त्यामुळे अमरावती विभागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडत असल्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने मुंबई, पुणे विद्यापीठानुसार परीक्षा पद्धती राबविण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. अमरावती विद्यापीठात बीएससी, एमएससी, एमकॉम, बीएससी(गृह विज्ञान) शाखेच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होत आहेत. विद्यापीठाने गृह विज्ञान शाखेत पहिली, तिसरी आणि पाचव्या सेमिस्टरची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घ्यायला हवी आणि दोन, चार, सहाव्या सेमिस्टर परीक्षा अमरावती विद्यापीठ स्तरावर घ्यावी. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या विद्यापीठांमध्ये प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालये घेतात. मुंबई विद्यापीठात प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय घेते आणि अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येते; परंतु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा घेण्याची पद्धती अगदी उलट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इतर विद्यापीठांमधील परीक्षा पद्धती अमरावती विद्यापीठाने स्वीकारली, तर विद्यार्थ्यांचे शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी होईल, असे शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावर्षीपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कला व वाणिज्य प्रथम वर्षाच्या परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे आणि या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे. त्यामुळे सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेताना अमरावती विद्यापीठाने पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या विषयाच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांकडे द्यावी आणि परीक्षा घेताना प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये. दोन, चार आणि सहा विषयांच्या परीक्षा विद्यापीठाने घ्यायला हव्यात, असे शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सेमिस्टर पद्धतीने परीक्षा विद्यापीठ घेणार असल्याने विद्यापीठ व कर्मचाऱ्यांवर परीक्षेचा ताण पडणार आहे. त्यामुळे विद्यापीठ फक्त परीक्षा घेण्याचे केंद्र होईल आणि परीक्षांचे निकालही उशिरा लागतील, अशी भीती शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  सेमिस्टर परीक्षेमध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या विषयाची परीक्षा महाविद्यालयांनी घ्यावी, त्यात प्रात्यक्षिक परीक्षा घेऊ नये. दोन, चार आणि सहा विषयांच्या परीक्षा अमरावती विद्यापीठाने घ्याव्यात, तरच विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे जाईल.- प्रा. डॉ. सुभाष भडांगे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला.त्यामुळेच विद्यार्थी धरतात मुंबई, पुण्याची वाटमहाराष्ट्रामधील विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. महाराष्ट्रामधील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाला एकच विषय असतानाही त्या विद्यापीठांचा दर्जा टिकून आहे. अमरावती विद्यापीठामध्ये वर्षाला तीन विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडतो. त्याला एका विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळतच नाही. अनेक विद्यार्थी नापास होतात. पुढे शिक्षण सोडतात, तर काही गुणवंत विद्यार्थी मुंबई, पुण्याची वाट धरतात. ड्रॉपआऊट रेसो सर्वाधिक अमरावती विद्यापीठाच्या अत्यंत क्लिष्ट परीक्षा पद्धतीमुळे ७० टक्के विद्यार्थी एक किंवा दोन विषयांमध्ये नापास झाल्यास शिक्षण प्रवाहातून बाहेर पडतात. विद्यार्थ्यांचा ड्रॉपआऊटचा रेसो थांबवायचा असल्यास, सेमिस्टर परीक्षेची जबाबदारी महाविद्यालयांकडे देऊन अंतिम वर्षाची परीक्षा विद्यापीठाने घ्यावी आणि विषयांची संख्या कमी करावी, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले.