अकोला - राज्यातील सुमारे ५0 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत अकोल्यातील तीन विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यामधील दोघांनी सिल्व्हर तर एकाने ब्रांझ पदक पटकावले. सहावी आणि नवव्या वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तीन टप्प्यात होणार्या या स्पर्धेसाठी आधी लेखी परीक्षा नंतर प्रत्यक्ष प्रयोग प्रोजेक्ट सादर करावा लागतो. या परीक्षेत प्रा. नितीन ओक यांच्या मार्गदर्शनाखालील अक्षय मालू आणि ऋतिक एकडे या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असून, ध्रुव लहरिया यानेही या परीक्षेत चमकदार कामगिरी केली. मुंबईत पार पडलेल्या एका समारंभात आयएसआरओचे डॉ. नाईक यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
बाल वैैज्ञानिक स्पर्धेत अकोल्यातील विद्यार्थ्यांची बाजी
By admin | Updated: March 5, 2015 01:57 IST