शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जंगल सफारीत विद्यार्थ्यांना घडले चार वाघांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 16:31 IST

अकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सातपुड्यातील जंगलात चक्क एक साथ चार वाघ आढळून आले. जंगलाचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 27 एप्रिल रोजी घडली.

- विजय शिंदेअकोटःमेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सातपुड्यातील जंगलात चक्क एक साथ चार वाघ आढळून आले. जंगलाचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 27 एप्रिल रोजी घडली.नागपूरच्या फॉरेन्सिक कॉलेजचा अभ्यास दौरा निमित्त प्राध्यापक अर्चना म्हाळकर  व त्यांचे विद्यार्थी अकोट तालुक्यातील शहानुर याठिकाणी आले होते. त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांचे दर्शन व्हावे, म्हणून वन विभागाच्या जंगल सफारी मधून धारगड, बोरी या परिसराची भ्रमंती केली. यावेळी उन्हाळ्याच्या दिवसात वाढलेल्या गवतातून एक नव्हे तर तब्बल चार वाघ व काही अंतरावर एका बिबट्याचे दर्शन त्यांना झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळुन वाघ पाहण्याचीही पहिलीच संधी असल्याने प्राध्यापक अर्चना महाडकर व त्यांचे विद्यार्थी चांगले स्तब्ध झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या कॅमेऱ्यातून वाघाचे शूटिंग घेतले तसेच फोटो पण काढले.यावेळी प्रत्यक्ष डोळ्यासमोर वाघाची प्रगती पाहून त्यांनी हा संपूर्ण थरारक प्रसंग आपल्या डोळ्यांमध्ये साठवला. केवळ वाघाची नाही तर इतर वन्य प्राण्यांचे सुद्धा त्यांना दर्शन झाले. विशेष म्हणजे सातपुड्याच्या जंगलात जंगल सफारीवर अर्चना म्हाळकर ह्या नागपूर वरून अनेकदा आल्या. परंतु त्यांना एकदाही वाघाचे दर्शन झाले नाही यावेळेस मात्र  चार  वाघ दिसून आल्याने त्यांच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जंगल सफारी मिळाल्यानंतर त्यांनी हा संपूर्ण प्रकार वन विभागाचे अधिकारी व इतरांना सांगितला. एकाच वेळी चार वाघ दिसून आल्याने मेळघाटच्या वन्यप्राणी संगोपनाचे व सुरक्षेतेचे महत्व अधोरेखित होत आहे.सातपुडा पर्वताचे वन परिक्षेत्र अमरावती, अकोला आणि बुलढाणा या परिसरात विखुरलेले आहे. या पर्वतीय क्षेत्रात विविध प्रकारच्या वनस्पती, सागवान, अर्जून, मोहन आदी विविध स्वरुपाची विपुल वनस्पती उपलब्ध आहे.  तापी, शहानूर, सिपना ह्या नद्या पर्वतीय रांगातून वाहतात. तसेच याच परिसरात पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रान गवा, रान म्हैस, काळविट, हरिण, कोल्हा, लांडगा इत्यादी वन्यप्राण्यांसह मोर, पांढरे बगळे, विविध प्रजातींचे पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र ठरले आहे.  मात्र पर्यावरणाचे संरक्षण, वन्यप्राण्यांचे नैसर्गिक जीवन जोपासण्याकरिता व विविध पक्ष्यांचे निवासस्थान या वनक्षेत्रात असल्याने   22 फेब्रुवारी 1974 मधे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करुन या व्याघ्र प्रकल्पाचे 1500.50 चौ.मी. कोअर क्षेत्र व 5285.60 चौ.मी.चे बफर क्षेत्र अतिसंरक्षीत करण्यात आले. या भागातील अनेक गावाचे पुर्नवसन झाल्याने वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. शिवाय सुरक्षित अधिवास क्षेत्र असल्याने दिवसेदिवस वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे.त्यामुळे विदर्भातील ताडोबा नंतर मेळघाटातील डोंगराच्या घनदाट जंगलात जंगली सफारीत वन्यप्राणी पाहण्याचा थरथराट सुखवाह ठरत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प