शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे ...

अकोला : ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, महसूल यंत्रणा व ग्रामविकास प्रशासनाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. ग्रामस्तरीय समितीचा सहभाग घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासनातील महत्त्वाचे घटक असलेले पोलीस स्टेशन प्रभारी, गटविकास अधिकारी ते ग्रामसेवक, तहसीलदार ते मंडळ अधिकारी, तलाठी इत्यादींसोबत जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी, गटविकास अधिकारी आदी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये-जा सुरू असते, त्यावर नियंत्रण आणावे, असे निर्देश दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. लग्न समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी सबळ (बहुधा वैद्यकीय) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी बाजारपेठा असलेल्या गावांमध्ये लहान लहान गावांतून लोकांची ये-जा सुरू असते, त्यावर नियंत्रण आणावे, असे निर्देश दिले. पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणारे, दुकानांवर होणारी गर्दी, अकारण होणारी वाहतूक यावर नियंत्रण मिळवावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिले. जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक पद्धतीने कशी करता येईल, यासाठी तालुका व उपविभागीय स्तरावर बैठक घेऊन नियोजन करावे. आपापल्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या विवाह समारंभांवर करडी नजर ठेवावी. गावातून बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी सबळ (बहुधा वैद्यकीय) कारण असल्याशिवाय परवानगी देऊ नये. ज्या ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील चाचण्या वाढविल्या पाहिजेत. प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केल्यास ग्रामीण भागात होत असलेला फैलाव आपण रोखू शकू, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले.