शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवस जिल्ह्यात राहणार कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST

कालावधी लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. ...

कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : संचारबंदी लागू असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम, जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच संसर्ग साखळीला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात पाच दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. रविवार ९ चे रात्री १२ वाजेपासून ते शनिवार १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवानगी असणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

दूध संकलन आणि वितरणासाठी दिली थोडी सवलत

n हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी याची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते रात्री आठ वाजेपर्यत सुरू राहील

n दूध संकलन केंद्रे व घरपोच दूध वितरण व्यवस्था सकाळी ७ ते ११ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.

ग्राहकांसाठी दुकाने बंद; पण देता येणार घरपोच सेवा

n सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी इत्यादी दुकाने, तर खाद्यपदार्थांची सर्व दुकाने बंद राहील.

n पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांशी निगडित दुकाने, गॅस एजन्सी.

ही व्यावसायिक प्रतिष्ठाने राहणार सुरू

खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाइन औषध सेवा २४ तास सुरू राहील. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील. शासकीय यंत्रणांमार्फत मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयक कामे चालू राहतील. या काळात विविध यंत्रणांना वेगळ्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही, हे विशेष

ही प्रतिष्ठाने राहणार बंद अन् सुरू

n कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने. मात्र, शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांची राहणार आहे.

n सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे बंद राहतील.

n केशकर्तनालय, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणीवर्ग बंद राहणार आहेत. परंतु, ऑनलाइन शिक्षण सुरू राहील.

n लग्न समारंभ, स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक व्यवसाय, नाट्यगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह बंद राहणार आहेत.

n चष्म्याची दुकाने बंद राहतील. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांस डोळ्यांच्या डॉक्टरांवर त्यांच्या दवाखान्याला जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातून चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.

n नागरी भागातील पेट्रोलपंप बंद राहतील. परंतु, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या वाहनांकरिता पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची राहणार आहे.

घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे.

n सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालयांना ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरू ठेवता येईल.

n सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी बंद राहतील. मात्र, कार्यालयीन वेळेत प्रशासकीय कामासाठी सुरू राहील.

n आपले सरकार सेवा केंद्रे व सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद राहतील, तर नागरिकांना घरून ऑनलाइन स्वरूपात प्रमाणपत्र व सुविधांकरिता अर्ज सादर करता येईल. दस्त नोंदणीचे काम बंद राहील.

n शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी बंद राहतील.

n सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहन यांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.