शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जुने शहरात ध्वज काढण्यावरून तणाव

By admin | Updated: January 13, 2015 01:34 IST

कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम, नागरिकांची नारेबाजी.

अकोला - अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जुने शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालयानजीक लावण्यात आलेला ध्वज काढण्यासाठी तणाव निर्माण झाला होता. तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वत:च ध्वज काढला. त्यानंतर अतिक्रमण हटाव पथकाने या ठिकाणचा ओटा उद्ध्वस्त केला. पोलीस प्रशासन व महापालिकेकडून संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण हटविण्यात येत असून, सोमवारी जुने शहरातील डाबकी रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पोलीस आणि मनपा प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान शासकीय व खासगी जागांवर लावण्यात येत असलेले ध्वज, फलक काढण्यात येत आहेत. ही विशेष मोहीम सोमवारी डाबकी रोडवरील फलक, ध्वज व इतर साहित्य काढण्यासाठी राबविण्यात आली असून, या रोडवर लावण्यात आलेले ध्वज, संत महंतांचे फोटो, फलक काढण्यात आले. डाबकी रोडवर मोठय़ा प्रमाणात फोटो, ध्वज व फलक लावण्यात आल्याने या रोडवर ही मोहीम राबविण्यास पोलीस व मनपा प्रशासनाला प्रचंड अडचण निर्माण झाली होती. कस्तुरबा गांधी रुग्णालय चौकात लावण्यात आलेला एक ध्वज काढण्यासाठी परिसरातील महिलांनी पथकाला अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस व मनपा प्रशासनाने ध्वजाची परवानगी मागितली असता येथील नागरिकांनी परवानगीचा कागद जळाल्याचे पथकाला सांगितले. त्यानंतर या पथकाने परवानगीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ४ वाजेपर्यंत वेळ दिला, त्यानंतरही परवानगीचे पत्र न दिल्याने या पथकाने तगडा पोलीस बंदोबस्त लावल्यानंतर आणि इतर समाजाचे फलक काढल्यानंतर परिसरातील महिला व नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन हा ध्वज काढला. त्यामुळे तणावाचे वातावरण निवळले. विविध समाजातील नागरिकांचे गट समोरा-समोर आल्याने या ठिकाणी नारेबाजी करण्यात आली. पोलीस व मनपा प्रशासनाने परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी नारेबाजी बंद केली. या चौकात राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे डाबकी रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.