शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरातील चौकांमध्ये फलकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 14:25 IST

विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जाहिरात फलकांच्या माध्यमातून पालिकेला कर मिळत असला तरी शहरातील चौकांचे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आले आहे. विधानसभेपूर्वी चौकांमध्ये फलकांची गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील प्रमुख चौक नेहमीच विविध राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवड, नियुक्ती, विविध उत्पादने व दुकानांच्या जाहिरातींनी गजबलेले दिसून येतात. यामध्ये बसस्थानकाजवळील संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, एडेड चौक, तहसील चौक व चिंचोले चौकाचा समावेश आहे. तात्पुरत्या स्वरूपात बॅनर लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज असते. यासाठी पालिकेकडून कर आकारण्यात येतो. मात्र अनेक फलक अनधिकृतरीत्या लावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येते. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने जवळपास सर्वच पक्षाचे नेते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमांचे फलक मोठ्या प्रमाणात चौकाचौकात झळकत आहेत. सर्व बाजूने लागलेल्या मोठमोठ्या बॅनरमुळे या सर्व चौकांचे विदु्रपीकरण होत आहे. एवढेच नव्हे तर यामुळे वाहनधारकांचे लक्ष विचलीत होऊन अपघात घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शहराच्या सौंदर्यात पुन्हा भर घालण्यासाठी पालिका प्रशासनाने अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. मुदत संपूनही अनेक बॅनर जैसे थेएका नियोजित कालावधीसाठी बॅनर लावण्याची परवानगी पालिका प्रशासनाकडून देण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चौकांमध्ये मुदत संपूनही अनेक फलक जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर आधीचे फलक कायम ठेवून दुसरे फलक लावण्यात येत असल्याचे प्रकारही सुरू आहेत. या सर्व प्रकाराकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पालिकेचा करही मोठ्या प्रमाणात बुडत असल्याचे वास्तव आहे.

शहरातील चौकांमध्ये विहित कालावधीसाठी फलक लावण्याची परवानगी पालिकेकडून देण्यात येते. यासाठी फलकाच्या साईजनुसार शुल्क आकरण्यात येते. मुदत संपलेले फलक आढळून आल्यास किंवा यासंदर्भात काही तक्रारी आल्यास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सदर फलक काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येते.-दीपक सोनुने,अतिक्रमण विभाग, न. प. बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा