शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

निधीत अडकली पाणीटंचाईची देयके

By admin | Updated: July 13, 2015 01:56 IST

तीन कोटींची देयके प्रलंबित; मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर.

अकोला: जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणासाठी जून अखेरपर्यंत जिल्हय़ात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांची तीन कोटी आठ लाख ४८ हजार रुपयांची देयके अद्याप प्रलंबित असून, शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अडकली आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्हय़ातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ४५८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या ५८२ उपाययोजनांच्या कृती आराखड्यास डिसेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्‍यांकडून मंजुरी देण्यात आली होती. कृती आराखड्यातील उपाययोजनांच्या कामांसाठी ११ कोटी ८३ लाख ३२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. पाणीटंचाई कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्हय़ातील १९९ गावांमध्ये १५६ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात करण्यात आली. ग्रामपंचायती आणि खासगी कंत्राटदरांकडून पूर्ण करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांपैकी १५१ उपाययोजनांच्या कामांची देयके प्रलंबित आहेत. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्हय़ात पाणीटंचाई निवारणाच्या पूर्ण करण्यात आलेल्या कामांच्या देयकांपोटी आवश्यक असलेला निधी अद्याप शासनाकडून उपलब्ध झाला नाही. कामांची देयके अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी आठ लाख ४८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला; मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याने, पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अद्यापही प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून निधी केव्हा उपलब्ध होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.